शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे डॉ. संजय शिंदे अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 01:36 IST

येथून मोखाडा येथे कारने जात असताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,रा.कामटवाडे, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.

नाशिक : येथून मोखाडा येथे कारने जात असताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात गाडीचे टायर फुटल्याने मूळचे नाशिक येथील डॉ .संजय पोपटराव शिंदे (४५,रा.कामटवाडे, सिडको) हे ठार झाले. या अपघातात दोघे जखमी झाले आहेत. यामध्ये खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित यांचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अधिक वृत्त असे कारचे टायर फुटल्याने चालक शिंदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्यावरील पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळले. अपघातमध्ये शिंदे यांना गंभीर मार लागला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन शिंदे यांना मोटारीतून बाहेर काढले. सुदैवाने एका गर्भवतीला प्रसूतीसाठी त्र्यंबकेश्वर येथून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणारी १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी आली. त्यांना नागरिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर डॉक्टरांनी शिंदे यांच्यावर प्रथमोपचार केले. तसेच त्यांना याच रु ग्णवाहिकेतून नाशिकला नेले. जिल्हा रु ग्णालयातील डॉक्टरांनी शिंदे यांना तपासून मयत घोषित केले.
या अपघातामध्ये खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजिव रोहित गावित व जतीन संख्ये हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू