डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी अपडेट; पतीकडून दीड वर्ष मानसिक छळ, भावाचा खळबळजनक आरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 20:32 IST2026-03-09T20:02:41+5:302026-03-09T20:32:46+5:30

डॉ. मनिषा जेजूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dr Manisha Jejurkar Takes Extreme Step Case Filed Against Absconding Husband | डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी अपडेट; पतीकडून दीड वर्ष मानसिक छळ, भावाचा खळबळजनक आरोप!

डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणात मोठी अपडेट; पतीकडून दीड वर्ष मानसिक छळ, भावाचा खळबळजनक आरोप!

Dr. Manisha Jejurkar Case:नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या गंगापूर रोड परिसरात डॉ. मनीषा जेजुरकर  या महिला डॉक्टरने पतीच्या छळाला कंटाळून गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. डॉ. मनीषा जेजुरकर या एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ आणि समुपदेशक होत्या. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डॉ. मनीषा आणि डॉ. निलेश जेजुरकर हे गंगापूर रोड भागात आपल्या दोन मुलींसह राहत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या डॉक्टर दाम्पत्यामध्ये वादाची ठिणगी पडली होती. डॉ. निलेश यांचे एका अन्य महिला डॉक्टरशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मनीषा यांना होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, या विवाहबाह्य संबंधांमुळे घरात वारंवार खटके उडत होते आणि याच वादातून मनीषा यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.

नातेवाईकांचे गंभीर आरोप

शुक्रवारी डॉ. मनीषा यांनी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. डॉ. मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात आणि भाऊ हेमंत भास्कर यांनी डॉ. निलेश यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून डॉ. निलेश हे मनीषा यांचा सतत मानसिक छळ करत होते. नातेवाईकांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी अनेकदा चर्चेचा प्रयत्न केला, पण डॉ. निलेश यांनी प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने चर्चा टाळली, असा दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला.

दुसरीकडे, पतीने आपल्या अनैतिक संबंधांमध्ये मनीषा अडथळा ठरत असल्याच्या रागातून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

रुग्णालयात तणाव आणि पोलीस कारवाई

घटनेनंतर डॉ. मनीषा यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी सुरुवातीला नकार दिला होता, ज्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर हे दोन दिवसांपासून फरार आहेत. गंगापूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्यांचा कसून शोध घेत आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि या घटनेला जबाबदार असलेल्या इतरांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा पवित्रा मयत डॉक्टरच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

Web Title : डॉ. मनीषा जेजुरकर मामला: पति पर मानसिक उत्पीड़न का आरोप, आत्महत्या की ओर धकेला।

Web Summary : नाशिक में डॉ. मनीषा जेजुरकर की आत्महत्या, पति डॉ. नीलेश द्वारा कथित मानसिक उत्पीड़न का खुलासा। परिवार का आरोप है कि अवैध संबंध के शक में नीलेश ने सालों तक प्रताड़ित किया, जिससे मनीषा ने आत्महत्या की। पुलिस जाँच कर रही है।

Web Title : Dr. Manisha Jejurkar Case: Husband Accused of Mental Abuse Leading to Suicide.

Web Summary : Dr. Manisha Jejurkar's suicide in Nashik exposes alleged mental torment by her husband, Dr. Nilesh, due to suspected infidelity. Family claims he drove her to suicide after years of abuse and ignoring attempts to resolve conflict. Police are investigating.