मालेगाव परिसरात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST2021-04-15T04:13:26+5:302021-04-15T04:13:26+5:30

महानगरपालिका कार्यालय मालेगाव : महानगरपालिकेद्वारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जुने बसस्थानक ...

Dr. Malegaon area. Greetings to Ambedkar | मालेगाव परिसरात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

मालेगाव परिसरात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

महानगरपालिका कार्यालय

मालेगाव : महानगरपालिकेद्वारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

जुने बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यास सकाळी महापालिका उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस व उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास दोरकुलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या संवाद कक्ष सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त धनंजय निकम यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महापालिका उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस व उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास दोरकुलकर, सहा. आयुक्त वैभव लोंढे, तुषार आहेर, लेखापरीक्षक राजू खैरनार, प्र. नगरसचिव श्याम बुरकुल, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, प्र. संगणक विभागप्रमुख सचिन महाले, हरीश डिंबर, प्र. पा.पू. अभियंता जयपाल त्रिभुवन, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, प्र. उद्यान अधीक्षक निलेश पाटील, संजय पवार, उदय आहिरे, सचिन रावेरकर आदी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Dr. Malegaon area. Greetings to Ambedkar