'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:03 PM2019-12-14T12:03:48+5:302019-12-14T12:10:12+5:30

काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे.

'Don't set aside patriotism to save government; BJP ready for political compromise Says Ashish Shelar to Shiv Sena | 'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

'सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका; राजकीय तडजोड करायला भाजपा तयार'

Next
ठळक मुद्दे घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकीसत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हतासरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका, भाजपाचं शिवसेनेला आवाहन

नाशिक - नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशहिताचे आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी हे देशहितासाठी विधेयक स्वीकारावं, हे विधेयक देशासाठी आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये, सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. नाशिक येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं लोकसभेत समर्थन केले अन् राज्यसभेत पळून गेले, सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयक अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं महाराष्ट्रात सरकार आहे त्यामुळे राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं तडजोड करू नये. देशहितासाठी भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोड करायला तयार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर आमचा पराभव झाला आहे. या 12 जागांचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पराभव नेमका का झाला याचा अहवाल सादर करणार आहे. काँग्रेसचं देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचा टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला. 

दरम्यान, शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला आवाहन करत तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेलं हे ऑटो रिक्षा सरकार आहे. रिक्षा कितीही चांगली असली तरी तिला वेगमर्यादा असतात. या सरकारमध्ये अंतर्गत विरोध खूप आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने हे सरकार कितपत चालेल हे आता सांगता येत नाही. मात्र शिवसेनेने आजही साद दिली तरी आमचे दार उघडेच आहे. आम्ही कधीही हाक द्यायला तयार आहोत पण समोरुन प्रतिसाद यायला हवा असं त्यांनी सांगितले होते. फडणवीसांच्या या विधानावर दरवाजे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडले नाही, तेव्हा कडी-कुलूप लावून बसले होते. आता वेळ निघून गेली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. 
 

Web Title: 'Don't set aside patriotism to save government; BJP ready for political compromise Says Ashish Shelar to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.