शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नॉन कोविड रुग्णांसाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:44 IST

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाइल व्हॅन दाखल झाल्या आहेत.

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या संकल्पनेतून मालेगावकराच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाइल व्हॅन दाखल झाल्या आहेत. या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात जाऊन तेथील रु ग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत. या तपासणी मोहिमेत सारी व कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करून त्यांना शासकीयरु ग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने, या अकरा मोबाइल व्हॅन कोरोनामुक्त मालेगाव करण्यात नक्कीच खारीचा वाटा उचलतील, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका व सर्व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंंह, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, उपस्थित होते. यावेळी भुसे म्हणाले, मोबाइल व्हॅनची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ही सेवा मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.प्रत्येक व्हॅनचे रिपोर्टिंग होणार असल्याने कोणकोणत्या भागात व किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याचा अहवालही मिळणार आहे. सेवेत दाखल होणाºया मोबाइल व्हॅनमुळे कोरोना आणि नॉन कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी या व्हॅन्सचा नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त माने यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :docterडॉक्टर