उद्ध्वस्त ‘गोदापार्क’चा आनंद मानू नका!

By Admin | Updated: August 5, 2016 01:56 IST2016-08-05T01:55:39+5:302016-08-05T01:56:08+5:30

राज यांचा टोला : नुकसानीबाबत रिलायन्सशी चर्चा करणार

Do not enjoy the Godpark ruined! | उद्ध्वस्त ‘गोदापार्क’चा आनंद मानू नका!

उद्ध्वस्त ‘गोदापार्क’चा आनंद मानू नका!

 नाशिक : ‘गोदापार्क’च्या नुकसानीमुळे वाईट वाटणारच. माझ्या मुलांसाठी ती बाग नाही. नाशिककरांनाच त्याचा लाभ होणार आहे. महापूर आपल्या हातात नाही. केवळ गोदापार्कच नव्हे तर काठावरचे सर्वच उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे उद्ध्वस्त गोदापार्कचा आनंद मानण्यासारखे काहीही नसल्याचा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मंगळवारी गोदावरीला आलेल्या महापुरामध्ये ‘गोदापार्क’चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज ठाकरे यांनी बुधवारी गोदापार्कच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज यांनी सांगितले, महापुराच्या घटना घडत राहणार आहेत. त्यामुळे नुकसान होणारच आहे. सदर नुकसानीबाबत कुणी आनंद मानू नये. नुकसानीसंदर्भात लवकरच रिलायन्सशी चर्चा करू. महापालिका प्रशासनालाही आवश्यक त्या सूचना केल्या असल्याचे राज यांनी सांगितले. शहरातील नैसर्गिक नाले बुजवले गेल्याने पावसाचे पाणी साचले असल्याबद्दल बोलताना राज म्हणाले,

Web Title: Do not enjoy the Godpark ruined!