प्रभाग ६१ पोटनिवडणूक; १४ उमेदवारांचे अर्ज वैध

By Admin | Updated: June 13, 2014 00:23 IST2014-06-12T01:13:10+5:302014-06-13T00:23:20+5:30

प्रभाग ६१ पोटनिवडणूक; १४ उमेदवारांचे अर्ज वैध

Division 61 by-election; 14 candidates' application is valid | प्रभाग ६१ पोटनिवडणूक; १४ उमेदवारांचे अर्ज वैध

प्रभाग ६१ पोटनिवडणूक; १४ उमेदवारांचे अर्ज वैध


नाशिकरोड : विहितगाव-वडनेर प्रभाग ६१ च्या पोटनिवडणुकीत १४ उमेदवारांचे अर्ज आज झालेल्या छाननीमध्ये वैध ठरले. प्रभाग ६१ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून केशव पोरजे, राष्ट्रवादीकडून रवींद्र हांडोरे व कैलास हांडोरे, शिवाजी जाधव, पोपट हगवणे, संतोष बोराडे, समाधान कोठुळे, धनंजय पाटील, महेंद्र पोरजे, प्रभाकर पाळदे, शिवनाथ हांडोरे, शिवाजी हांडोरे, संजय हांडोरे, विजय हांडोरे या १४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज झालेल्या छाननी प्रक्रियेत १४ ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज माघारीसाठी शुक्रवारपासून मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Division 61 by-election; 14 candidates' application is valid