१९ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:16 IST2021-02-25T04:16:46+5:302021-02-25T04:16:46+5:30

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा ...

District team selection test for cricketers under 19 years of age | १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

१९ वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्पर्धा होणार असून त्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १९ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी शनिवारी (दि. २७) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे घेण्यात येणार आहे.

या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या खेळाडूंचाच विचार करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथील कार्यालयात कामकाजाच्या वेळेत - सकाळी ८.३० ते १०.३० व सायंकाळी ४ ते ६.३० पर्यंत, चाचणी शुल्कासह नावे नोंदवावीत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तासाला खेळाडूंची यादीनुसार निवड चाचणी घ्यायची असल्याने शुक्रवार २६ फेब्रुवारीपर्यंतच नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नावे नोंदविलेल्या खेळाडूंनी क्रिकेट पोशाखात, स्वतःच्या क्रिकेट साहित्यासह २७ फेब्रुवारी रोजी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: District team selection test for cricketers under 19 years of age