शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : बांधकामाचा ४० टक्के निधी अखर्चित

By admin | Updated: March 4, 2016 23:04 IST

रस्त्यांच्या कामांना कात्री

नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीपैकी बांधकाम विभागाचा ४० टक्के निधी अखर्चित राहिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत उघड झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या वतीने तीन लाखांच्या आतील सादर केलेल्या बांधकाम विभागातील रस्त्यांच्या कामांवर जिल्हा प्रशासनाने बोट ठेवले असून, ही कामे मंजुरीस साफ नकार दिल्याने बांधकाम विभागाची गोची झाली आहे.जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला वितरित केलेल्या निधीचा आढावा घेतला. त्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग एक, दोन व तीन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची तीन लाखांच्या आतील २ लाख ९९ हजारांची एकसारखे अनेक कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळासमोर सादर केले असता हे प्रस्ताव एकसारखेच आणि एक सारख्याच रक्कमेचे का? शिवाय एकसारखीच मोऱ्यांची कामे कशासाठी? यासह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नांची उत्तरे देता देता नाकीनव आल्याचे कळते. त्यामुळेच या तीन लाखांच्या आतील रस्ते व मोऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यास जिल्हा नियोजन विभागाने नकार दिल्याने या कामांपोटी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होण्याची शक्यता कमी आहे.जिल्हा नियोजन मंडळाकडून जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिलेल्या एकूण निधीपैकी ६० टक्के निधी खर्च झाला असून, उर्वरित ४० टक्के निधी येत्या ३१ मार्चअखेर जिल्हा परिषदेला खर्च करावा लागणार आहे. त्यातही या ४० टक्के निधीत सर्वाधिक निधी बांधकाम विभागाचाच अखर्चित राहण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)