शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागांमध्ये तोडफोड; कार्यक्षेत्र विस्तारले

By admin | Updated: October 8, 2016 01:18 IST

प्रभागांमध्ये तोडफोड; कार्यक्षेत्र विस्तारले

नाशिकरोड : आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग रचनेत बदल झाल्याने विद्यमान नगरसेवकांना नूतन प्रभागांमध्ये मतदार शोधण्याची वेळ येणार आहे. बहुतांश नगरसेवकांचा प्रभाग विस्तारल्याने त्यांच्यापुढे कार्यक्षेत्रात संपर्क वाढविण्याचे आव्हान असणार आहे.
प्रभाग २१ मध्ये सरमिसळ
नवीन प्रभाग २१ मध्ये सध्याच्या प्रभाग ५८, ५९, ५५ काही भाग व प्रभाग ६० चा थोडासा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. सरमिसळ परिसर असलेल्या नवीन प्रभाग २१ (अ) अनुसूचित जाती महिला, (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण असे आरक्षण आहे. अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे नगरसेवक वैशाली दाणी, कोमल मेहरोलिया व रमेश धोंगडे, संगीता गायकवाड यांना निवडणूक लढण्यास अडचण येणार नाही. अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे नगरसेवक सुनील वाघ यांची अडचण झाली असली तरी त्यांना सर्वसाधारणचा मार्ग खुला आहे. सध्याच्या प्रभाग ५९ व ५५ चा परिसर नवीन प्रभाग २०, २१ मध्ये कमी जास्त समाविष्ट असल्याने तेथील नगरसेवक कुठल्या प्रभागात उडी मारतात, हे परिस्थितीनुसार स्पष्ट होईल. प्रभागरचनेनुसार या ठिकाणी देखील इच्छुकांची भाऊगर्दी राहणार आहे. प्रभागाची लोकसंख्या ४,७६८ इतकी असून अनुसूचित जाती १०,७२२ व जमातीची ९९० आहे.
गावठाणचा प्रभाग २२
नवीन प्रभाग २२ मध्ये सध्याचा प्रभाग ६०, ६१ चा बहुतांश भाग समाविष्ट झाला असून प्रभाग ५५, ५७ चा काहीसा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग २२ (अ) अनुसूचित जाती महिला (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक नयना वालझाडे, सुनीता कोठुळे यांची अडचण होणार नाही.
मात्र सर्वसाधारण जागेकरिता सूर्यकांत लवटे, केशव पोरजे दावेदार राहणार असल्याने पक्षासमोर अडचण निर्माण होणार आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून असलेली काही इच्छुक स्वत:हून थांबण्याची शक्यता आहे. नवीन प्रभागरचनेमुळे नगरसेवक व इच्छुकांमध्ये ‘कही खुशी कही गम’चे वातावरण आहे. (प्रतिनिधी)