शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा पंचांगकर्त्यांनी वर्तविलेल्या भाकिताचीही !

By admin | Updated: November 17, 2016 01:03 IST

नोटाबंदीचा निर्णय : सरकारी निर्णयावर वर्षभरापूर्वीच केले होते भाष्य

 नाशिक : मोदी सरकारने पाचशे-हजारच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर देशभर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीबाबत पंचांगकर्त्यांनी वर्षभरापूर्वीच वर्तविलेल्या भाकितांचीही चर्चा सर्वत्र कानी पडत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या ज्योतिषशास्त्राबद्दल शंका घेणारे संदेश फिरत असताना ज्योतिषअभ्यासकांनी पंचांगकर्त्यांचे दाखले देत शंकेखोरांना निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या मंगळवारी (दि. ८) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना चलनातून पाचशे-हजारच्या नोटा रद्द करण्याचा धक्कादायक आणि धाडसी निर्णय घोषित केला आणि एकूणच देशभर खळबळ माजली. सरकारच्या या निर्णयाचे सामान्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत सामान्यांच्या हिताच्या विरोधी निर्णय झाल्याची भावना व्यक्त केली. गेल्या आठ दिवसांपासून नोटा बदलण्यासाठी अथवा बॅँकेत पाचशे-हजारच्या नोटांचा भरणा करण्यासाठी बॅँकांसमोर रांगा लागलेल्या असल्याने त्यातून सरकारविरोधी सूरही उमटताना दिसत आहे. नोटाबंदीच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस सध्या व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक या माध्यमांद्वारे पडत आहे. त्यात ज्योतिषशास्त्राबद्दलही शंका घेणारे संदेश फिरत आहेत. ज्योतिषांनी या नोटाबंदीबाबत भाकिते का वर्तविली नाहीत, असे सवालही उपस्थित होत आहेत. मात्र, ज्योतिषअभ्यासकांनी आता काही पंचांगकर्त्यांनी वर्षभरापूर्वीच वर्तविलेल्या भाकितांचा दाखला देत ज्योषितशास्त्राची बदनामी करणाऱ्यांविरोधी मोहीम उघडली आहे. त्यासाठी सोलापूर येथील प्रसिद्ध दाते पंचांगकर्त्यांनी वर्तविलेले भाकीत पुढे केले जात आहे. (प्रतिनिधी)