शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी

By admin | Updated: April 14, 2015 01:31 IST

मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी

नाशिक : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत नाशिक महापालिकेमार्फत आखण्यात आलेल्या मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने बोट ठेवले असून, महापालिकेने तयार केलेल्या २९३ कोटी ९९ लाख रुपयांच्या प्राकलनाची किंमत ४८ कोटींनी घटवत २४५ कोटी ७८ लाखांवर आणली आहे. जीवन प्राधिकरणने केलेल्या या तांत्रिक मूल्यांकनातून महापालिकेतील संबंधित खात्याचा संशयास्पद कारभारही समोर आला आहे. मुकणे धरणातून थेट पाणीपुरवठा योजनेसाठी २२० कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळालेली होती; परंतु महापालिकेने नंतर त्यात तांत्रिक बदल करून प्राकलन २९३ कोटी ९९ लाखांवर नेऊन पोहोचविले होते. याबाबत खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनीही आक्षेप नोंदवले होते. संबंधित विभागाने निविदा मागविण्यापूर्वी आणि एका बड्या कंपनीची कमी निविदा दाखविण्यासाठी सदर तांत्रिक बदल केल्याचा आरोप संबंधित लोकप्रतिनिधींनी केला होता. महापालिका आयुक्त डॉ. गेडाम यांनीही रुजू झाल्यानंतर या तांत्रिक बदलाबाबत विचारणा केली होती आणि सदर योजनेच्या तांत्रिक मूल्यांकनासाठी प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविला होता. त्यानुसार जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत लांडगे यांनी तांत्रिक मूल्यांकन अहवाल अधीक्षक अभियंत्यांना सुपूर्द केला असून, योजनेतील अनेक त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. जीवन प्राधिकरणने २४५ कोटी ७८ लाख २२ हजार ३१५ रुपये इतक्या तांत्रिक मूल्यांकन किमतीस मंजुरी दिली आहे. प्राधिकरणच्या मते, महापालिकेने सदरच्या निविदा मागविण्यापूर्वी केंद्र शासनामार्फत मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये काही तांत्रिक बदल केले आहेत. मात्र, या बदलास व सदर कामाकरिता होणाऱ्या जादा खर्चास नियमानुसार मंजुरी घेण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सदर कामाची निविदा ही ‘सी’ प्रकारची असल्याने स्कोप आॅफ वर्कनुसार ठेकेदाराने सविस्तर संकल्पने व आराखडे सादर करून काम यशस्वीरीत्या पूर्ण करून देण्याच्या अटीवर देकार सादर करणे अपेक्षित असते. परंतु असा काही दस्तावेज सादर केलेला नाही. केवळ महापालिकेने सादर केलेल्या दस्तावेजाच्या आधारेच आवश्यक त्या दुरुस्त्या करून तांत्रिक मूल्यांकन करण्यात आले आहे. याशिवाय इनटेक वेल, इन्स्पेक्शन वेल, जॅकवेल या उपांगांच्या राफ्टची थिकनेसही खूपच जास्त प्रस्तावित करण्यात आली आहे. मूल्यांकनात ११ ते १५ मीटर इतक्या उंचीचा कॉफर डॅम प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात धरणातील पाण्याची खोली १८ मीटर इतकी असताना, कॉफर डॅमचे बांधकाम करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही. अशुद्ध पाण्याची दाबनलिका ही राष्ट्रीय महामार्गालगतच्या हद्दीत टाकण्याचे प्रस्तावित आहे. परंतु त्यामुळे खोदाई होऊन महामार्गाचे नुकसान संभवते. या त्रुटींवर जीवन प्राधिकरणने बोट ठेवत पालिकेच्या भोंगळ कारभाराकडेच लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)