नाशिक महानगरपालिकेमध्ये दिनकर पाटील यांचे ठिय्या आंदोलन सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 00:55 IST2019-06-28T00:53:54+5:302019-06-28T00:55:51+5:30
नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असतानादेखील सभागृहात विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन करणारे नाशिक महापालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.

नाशिक महानगरपालिकेमध्ये दिनकर पाटील यांचे ठिय्या आंदोलन सुरूच
नाशिक- नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असतानादेखील सभागृहात विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन करणारे नाशिक महापालिकेतील सभागृह नेते दिनकर पाटील यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी नगरसेवक सतीश बापू सोनवणे यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिनकर पाटील हे मंगळवारी महासभेत आक्रमक झाले होते त्यांनी बेकायदा धार्मिक स्थळांना संरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, अजूनही हे आंदोलन सुरू आहे. त्यांचे सहकारी नगरसेवक रवींद्र धिवरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते गजानन शेलार हे देखील सभागृहात ठिय्या मांडून आहेत.
पाटील यांच्या बरोबरच गटनेता संभाजी मोरुस्कर यांचेही पद काढून घेण्यात आले असून, त्यांच्या जागी जगदीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे