शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

दिंडोरीत डॉ. भारती पवार यांचा विजय ; भाजपने राखला चौथ्यांदा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 2:20 AM

जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांचा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने दणदणीत पराभव केला.

नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांचा मोठ्या मताधिक्याच्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारती पवार यांच्या रूपाने जिल्ह्यातून पहिल्यांदाच महिला खासदार संसदेत जाऊन पोहोचली आहे. भारती पवार यांना ५ लाख ६७ हजार ४७० मते मिळाली, तर राष्टÑवादीचे धनराज महाले यांना ३ लाख ६८ हजार ६९१ मते मिळाली. माकपाचे उमेदवार जीवा पांडू गावित यांना १ लाख ९ हजार ५७० मते मिळविता आली. वंचित आघाडीचे उमेदवार बापू बर्डे ५८ हजार ८४७ मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिले. पवार यांच्या विजयाने भाजपने सलग चौथ्यांदा गड राखला आहे.दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाउस येथे निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ अशा प्रकारे दिंडोरी मतदारसंघासाठी ८४ टेबल्स लावण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी सहा वाजेपासूनच मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतमोजणी केंद्रात आगमन झाल्याने कोणत्या टेबलवर कोण अधिकारी, कर्मचारी असेल ते संगणकीय प्रणालीने जाहीर करण्यात आले व प्रत्येकाला आपल्या टेबलवर आसनस्थ करण्यात आले. आठ वाजेच्या ठोक्याला उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचे सील काढण्यात आले. त्यानंतर पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली. त्यासाठी दोन टेबल स्वतंत्र लावण्यात आले. यंदा पोस्टल मतपत्रिकांना बारकोड असल्यामुळे व प्रत्येक मतपत्रिकेचे स्कॅनिंग करण्याचे आयोगाचे आदेश असल्याने अत्यंत काळजीपूर्वक या मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आयोगाच्या आदेशाने ईव्हीएमची मतमोजणी सुरू करण्यात आली.दिंडोरी मतदारसंघात १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ६५ टक्के म्हणजे ११ लाख ३४ हजार ७१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. दिंडोरी मतदारसंघात ८ उमेदवार असल्याने मतमोजणीच्या कामाने वेग घेतला. त्यामुळे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत २५ फेºया पूर्ण झाल्या होत्या. भाजपच्या भारती पवार यांचा विजय प्रत्येक फेरीगणिक निश्चित होत गेला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन त्याचे रूपांतर जल्लोषात होत गेले. भारती पवार यांच्या नाशिकमधील निवासस्थानीही कार्यकर्त्यांनी गर्दी करून आनंदोत्सव साजरा केला तर भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मोदींच्या नावाचा जयघोष केला. पवार यांच्या दळवट गावीही ग्रामस्थांनी विजयाचा जल्लोष करीत पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.ए.टीं.चे स्वप्न स्नुषेने केले पूर्णस्व. ए. टी. पवार यांनी १९७१ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी भारतीय राष्टÑीय कॉँग्रेसचे उमेदवार झामरू मंगळू कहांडोळ यांनी पवार यांचा पराभव केला होता. पवार यांनी भारतीय क्रांती दलाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविली होती. ए.टीं.ची खासदारकीची इच्छा अपूर्णच राहिली. परंतु, तब्बल ४८ वर्षांनंतर ए.टीं.चे स्वप्न त्यांची स्नुषा भारती पवार यांनी पूर्ण केले.भारतीय जनता पार्टीने सलग चौथ्यांदा दिंडोरीचा गड राखला आहे. तर आजवर पाच वेळा या मतदारसंघावर आपला कब्जा केला आहे. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा या मतदारसंघातून कचरू भाऊ राऊत यांच्या माध्यमातून विजय संपादन केला होता. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी हॅट्ट्रिक साधली होती. आता पाचव्यांदा गड राखला आहे.धनराज महाले यांच्या पराभवाची ५ कारणेयुती होण्याची चाहूल लागल्याने राष्टवादीची धरलेली वाट आणि पक्षांतर्गत नाराजीचा फटकाराष्टÑवादीचे बालेकिल्ले असलेल्या नांदगाव आणि येवला येथे मताधिक्य मिळविण्यात अपयशमहाआघाडीत माकपा आणि वंचित आघाडीचा समावेश न झाल्याने मतविभागणीचा फटकाभाजपातील नाराजांकडून व पूर्वाश्रमीच्या पक्षसहकाºयांकडून मिळू न शकलेली मदतभाजप उमेदवारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सभा घेतल्याने बदलले समीकरणजनतेने दिलेला कौल मान्यजनतेने दिलेला कौल मान्य आहे. या निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी जनतेचे आभार मानण्यासाठी दौरा करणार आहे. मतदारसंघातील कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला मी धन्यवाद देतो. मला वारसा आहे, त्याचा निश्चितच उपयोग होईल. - धनराज महाले, राष्टवादीकारणे विजयाचीराष्टवादी कॉँग्रेसने डावललेली उमेदवारी पथ्यावर पडल्यानेच विजय सुकर.मतदारांशी सातत्याने संपर्क आणि उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती.जिल्हा परिषद सदस्यपदाच्या माध्यमातून केलेली विकासकामे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदारसंघात जाहीर सभा झाल्याने मिळाले पाठबळ.दिवंगत माजी मंत्री ए. टी. पवार यांची स्नुषा म्हणून मतदारांचा मिळालेला कौल.राष्टवादीला मिळाला इशारादिंडोरी लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी नांदगाव, येवला आणि दिंडोरी या मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार आहेत. त्यातही येवला मतदारसंघात राष्टवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ तर नांदगावी त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आमदार आहेत. त्यानंतर दिंडोरी हा राष्टवादीचा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो; परंतु या तीनही मतदारसंघात भारती पवार यांनी लक्षणीय मते घेतल्याने तो राष्टवादीला इशाराचा मानला जात आहे.चव्हाणांच्या नाराजीची मात्रा चालली नाहीदिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारत ऐनवेळी राष्टÑवादीतून भाजपत दाखल झालेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांनी नाराजीचा सूर प्रकट करीत पालकमंत्र्यांवरही आरोप केले होते. याशिवाय, त्यांच्या समर्थकांनी बोलाविलेल्या मेळाव्यातही जे. पी. गावित यांच्या सुपुत्राने हजेरी लावल्याने चव्हाणांच्या नाराजीचा फटका पवार यांना बसणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. परंतु, चव्हाण यांची नाराजीची मात्रा चालली नसल्याचे दिसून आले.नाव                   पक्ष          मतेडॉ. भारती पवार भाजप 567470धनराज महाले राष्टÑवादी 368691जे. पी. गावित माकपा 109570अशोक जाधव बसपा 7703बापू बर्डे वंचित आघाडी 58847दादासाहेब पवार अपक्ष 5754दत्तू बर्डे अपक्ष 5631टी. के. बागुल अपक्ष 4502नोटा ---- 9446

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी