शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
4
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
5
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
6
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
7
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
8
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
9
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
10
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
11
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
12
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
13
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
14
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
15
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
16
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
17
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
18
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
19
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
20
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...

धाबे दणाणले : शहरातील जुगार अड्ड्याांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 8:59 PM

नाशिक : शहरातील जुगार अड्डा चालविणा-यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने दोन ठिकाणी छापे टाकत तीन जुगार अड्डा चालकांना बेड्या ठोकल्या .संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर आणि नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत कबीरनगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये ...

ठळक मुद्देकबीरनगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगारपाच मिलन नाईट, मिलन कल्याण, ओपन कल्याण क्लोज, नावाचा मटका

नाशिक : शहरातील जुगार अड्डा चालविणा-यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने दोन ठिकाणी छापे टाकत तीन जुगार अड्डा चालकांना बेड्या ठोकल्या .संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर आणि नाशिकरोडपोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत कबीरनगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. सोमनाथ देविदास बोहरा (रा.स्वारबाबानगर) आणि शशिकांत शंकर चारोस्कर हे दोघे स्व:ताच्या फायद्यासाठी टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी मध्यवर्ती युनिटचे हवालदार भिमा कर्डीले यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिटको स्टॉप परिसरातील राजेंद्र कॉम्प्लेक्स समोर पत्र्याच्या शेडमध्ये चालणारा जुगार अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. मंगळवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता जुगार अड्डा मालक गुलाब सोमनाथ दिवे (रा.चाडेगाव) हा युवक स्व:ताच्या फायद्यासाठी पाच मिलन नाईट, मिलन कल्याण, ओपन कल्याण क्लोज, नावाचा मटका अंक आकड्यांवर खेळवितांना मिळून आला. लोकांकडून पैसे घेवून तो मटका जुगार खेळवित होता. त्याच्या ताब्यातून ५ हजार ३७६ रूपयांची रोकड आ हस्तगत करण्यात आले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस