शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्र्यांचा ‘भक्तिभाव’ : त्र्यंबक, वेरूळला शासकीय खर्चाने दौरा

By admin | Updated: March 4, 2016 23:59 IST

ऐन दुष्काळात मंत्र्यांचे देवदर्शन!

नाशिक : एकीकडे विदर्भ व मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला असताना आणि राज्याचे अख्खे मंत्रिमंडळ पाहणी दौरे करीत असताना, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मात्र भक्तीचा भलताच उमाळा दाटून आला आहे. बहुधा त्यामुळेच मंत्रिमहोदयांनी ऐन दुष्काळात महाशिवरात्रीच्या दिवशी शासकीय खर्चाने निव्वळ देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर व वेरूळचा दौरा आखला आहे. विशेष म्हणजे, खुद्द मुनगंटीवार हे दुष्काळाच्या दाहक झळा सोसणाऱ्या विदर्भातील चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत.पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा मार्चमध्येच महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण संकट ओढवले आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाड्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या झळा तीव्र असून, पुढचे तीन महिने कसे काढावेत, या काळजीने बळीराजा हवालदिल झाला आहे. या संकटाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे अवघे मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला त्यातून कसा दिलासा देता येईल, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या संकटांत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थ, नियोजन व वनखाते सांभाळत असलेल्या मुनगंटीवार यांना मात्र दुष्काळावरील उपाययोजनांत लक्ष घालण्याऐवजी देवदर्शन महत्त्वाचे वाटत असल्याचे चित्र आहे. बहुधा त्यामुळेच येत्या सोमवारी जुळून आलेला महाशिवरात्रीचा योग त्यांना हुकवावासा वाटत नसावा. म्हणूनच दि. ७ मार्च रोजी मुनगंटीवार यांनी निव्वळ देवदर्शनासाठी शासकीय खर्चाने दौरा काढला आहे. माहिती कार्यालयाकडून त्यांचा हा दौरा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, दि. ७ रोजी मुनगंटीवार हे सकाळी ७ वाजता मुंबईच्या राजभवनातून शासकीय हेलिकॉप्टरने त्र्यंबकेश्वरकडे प्रयाण करतील. त्र्यंबकराजाचे दर्शन आटोपल्यावर सकाळी ८.४० वाजता त्यांचे हेलिकॉप्टर औरंगाबाद जिल्ह्णातील वेरूळच्या घृष्णेश्वराच्या दिशेने भरारी घेणार आहे. मुनगंटीवार या दौऱ्यात सहकुटुंब असतील का, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. तथापि, फक्त देवदर्शनासाठी आखलेल्या या दौऱ्यात मुनगंटीवार भलेही भोलेनाथाला दुष्काळ निवारणाचे साकडे का घालोत आणि ती मान्य होवो की न होवो; पण त्यांची ही प्रार्थना शासकीय तिजोरीला मात्र काही हजारांचा चुना लावणार असल्याची चर्चा आहे.