देवीदास पिंगळे जिल्हा रुग्णालयात

By Admin | Updated: January 15, 2017 00:51 IST2017-01-15T00:51:41+5:302017-01-15T00:51:52+5:30

अस्वस्थ : छातीत वेदना होत असल्याचा त्रास

Devidas at Pingale District Hospital | देवीदास पिंगळे जिल्हा रुग्णालयात

देवीदास पिंगळे जिल्हा रुग्णालयात

 नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १२७ कर्मचाऱ्यांच्या फरकाचे सुमारे ६२ लाख ३१ हजार रु पयांची अफरातफर केल्याप्रकरणी संशियत आरोपी असलेले विद्यमान सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मध्यवर्ती कारागृहातून उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि.१४) सकाळी दाखल करण्यात आले.
पिंगळे यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून, त्यांची इसीजीची चाचणी घेण्यात आली आहे. येत्या चोवीस तासांत त्यांची २-डी इको चाचणी करण्यात येणार आहे. चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येऊन पिंगळे यांना रुग्णालयातून कारागृहात हलविण्यात येणार आहे. पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
मागील काही वर्षांपासून बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पिंगळे यांच्यावर केला जात होता. (प्रतिनिधी)

Web Title: Devidas at Pingale District Hospital