उपआयुक्त विजय पगार यांचाही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:12+5:302020-12-05T04:24:12+5:30

गत आठवड्यात पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज महासभेवर सादर केला जाणार ...

Deputy Commissioner Vijay Pagar also applied for voluntary retirement | उपआयुक्त विजय पगार यांचाही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

उपआयुक्त विजय पगार यांचाही स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

गत आठवड्यात पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज महासभेवर सादर केला जाणार आहे, मात्र त्यापूर्वीच १ डिसेंबर रोजी विजय पगार यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्याची एक प्रत आयुक्तांनादेखील सादर केली आहे.

दरम्यान, महापालिकेत आता वादग्रस्त ठरू लागलेले अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी दीड महिन्याची रजा टाकली असून, तेदेखील बदलीच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Deputy Commissioner Vijay Pagar also applied for voluntary retirement