शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी

By admin | Updated: October 21, 2015 22:10 IST

सेवाकुंज येथे भुयारी मार्गाची मागणी

पंचवटी : सेवाकुंज परिसरात अनेक शाळा असून, वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने सेवाकुंज परिसरात लक्ष वेधून ‘भुयारी मार्ग’ तयार करावा, अशी मागणी नागरिक व विद्यार्थी पालकांनी केली आहे.काही दिवसांपूर्वी शहर बसने आजी व दोघा नातवंडांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत अडीच वर्षीय रोनितचा बळी गेला होता, तर त्याची आजी संगीता चौहान ही गंभीर जखमी झाली होती. ही घटना घडल्याने शेकडो नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत अपघातग्रस्त बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. भुयारीमार्ग, तसेच वाहतूक पोलिसांची वारंवार मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रोनितचा बळी गेल्याची घटना घडल्याचे सांगून नागरिकांनी प्रशासनावर तोफ डागली होती.काही वर्षांपूर्वी अशाचप्रकारे बसखाली दोघे विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरातील आर. पी. विद्यालय, श्रीराम विद्यालय, पंचवटी एज्युकेशन संस्था तसेच स्थानिक नागरिकांनी वर्षानुवर्षे मनपा व पोलीस प्रशासनाकडे भुयारी मार्ग करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती; परंतु प्रशासनाने त्याची आजपावेतो दखल घेतलेली नाही. सेवाकुंज परिसरातील शाळा व दररोज रस्ता ओलांडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने आता तरी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भुयारी मार्ग बनविण्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)