शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पंचशीलनगरातील गॅस गुदाम हटविण्याची सेनेची मागणी

By admin | Updated: December 13, 2015 22:35 IST

पंचशीलनगरातील गॅस गुदाम हटविण्याची सेनेची मागणी

नाशिक : कांदिवली, मुंबई येथे दामूनगर झोपडपट्टीत गॅस गुदामला लागलेल्या आगीमुळे घडलेली दुर्घटना लक्षात घेऊन शिवसेनेने गंजमाळवरील पंचशीलनगर येथील झोपडपट्टीत असलेले मयूर गॅस एजन्सीचे गुदाम हटविण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कांदिवली येथील झोपडपट्टीतील आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी होऊन दोघांना जीव गमवावा लागला. अशा प्रकारची दुर्घटना गंजमाळवरील पंचशीलनगरातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचशीलनगर झोपडपट्टीलगत मयूर गॅस एजन्सीचे सिलिंडरचे गुदाम असून, याठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सिलिंडरचा साठा केलेला असतो. झोपडपट्टीत सुमारे आठ ते नऊ हजारांची लोकवस्ती आहे. याठिकाणी झोपडपट्टीला लागूनच मनपाच्या सार्वजनिक शौचालयाची सेफ्टीक टॅँक आहे. यापूर्वी सदर सेफ्टीक टाकीचा स्फोट होऊन जीवितहानी झालेली होती. सदर सेफ्टीक टाकीही धोकादायक असल्याने स्फोटक वस्तुंमुळे दुर्घटना घडू शकते. सदर गुदाम शहराबाहेर हलविण्यात यावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, उपविभाग प्रमुख नाना काळे यांनी दिला आहे.