सर्वपक्षीय सदस्यांनी धरणे आंदोलन

By Admin | Updated: January 5, 2015 01:40 IST2015-01-05T01:40:25+5:302015-01-05T01:40:49+5:30

सर्वपक्षीय सदस्यांनी धरणे आंदोलन

Demand Movement by All-Parties | सर्वपक्षीय सदस्यांनी धरणे आंदोलन

सर्वपक्षीय सदस्यांनी धरणे आंदोलन

नाशिक : सव्वा वर्षापूर्वीच नाशिक जिल्हा परिषदेला बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांची झालेली बदली रद्द करावी यासाठी उद्या (दि़५) सर्वपक्षीय सदस्यांनी धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत बदली रद्द करण्याचे साकडे घातले आहे़ सोमवारी (दि़ ५) सकाळी ११ वाजता होणाऱ्या या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वपक्षांचे सदस्य सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे सदस्य गोरख बोडके व राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी सांगितले़ दरम्यान, अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी प्रधान सचिव, पालकमंत्री गिरीश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बनकर यांची बदली रद्द करण्यात यावी, असे निवेदन दिले आहे़ औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सुखदेव बनकर यांची आॅक्टोबर २०१३ रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली होती. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित कुमार यांचीही अडीच वर्षाच्या कार्यकाळातच चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली झाली होती. राज्यातील काही महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काल मंत्रालयातून निर्गमित करण्यात आले असून, त्यात राज्यातील काही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Demand Movement by All-Parties