शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समिती बरखास्तीची मागणी

By admin | Updated: July 17, 2017 00:11 IST

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक गैरव्यवहार घडले असतानादेखील आजवर आघाडी सरकारने बाजार समितीच्या दोषी संचालकांना पाठीशी घातले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक गैरव्यवहार घडले असतानादेखील आजवर आघाडी सरकारने बाजार समितीच्या दोषी संचालकांना पाठीशी घातले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने बाजार समितीच्या गेल्या वीस वर्षांतील कामकाजाची श्वेतपत्रिका काढावी आणि त्यात गैरव्यवहार आढळल्यास संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी भाजपाच्या मनोगत या नियतकालिकाचे समन्वयक रवींद्र अमृतकर यांनी केली आहे.  अमृतकर यांनी यासंदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सविस्तर निवेदन दिले आहे. या बाजार समितीची वार्षिक उलाढाल १४०० कोटी रुपयांची असून, उत्पन्न सुमारे चौदा कोटी आहे. समितीवर शिखर बॅँकेचे पन्नास कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. गेल्या वीस वर्षांत संचालकांचा कारभार वादग्रस्त राहिला आहे.  बाजार समितीची जप्त मालमत्ताही परस्पर विक्री करण्याचे प्रयत्न केले, परंतु राज्य शिखर बॅँकेने त्यांच्यावर कारवाई न करता संरक्षण दिले, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दोन वर्षांची आर्थिक पत्रके तयार नसणे, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केलेल्या ५७ लाख रुपयांच्या रकमेची वस्तुस्थिती या सर्वांचा विचार करता बाजार समितीच्या सर्व नुकसानीची सक्त वसुली संचालनालयामार्फत चौकशी करावी, अशी मागणी अमृतकर यांनी केली आहे. पुरेसे उत्पन्न असतानाही संचालकांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतमालाची चोरी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मिळालेल्या मोबदल्याची लूटमार, असे प्रकार होत असतात. बाजार समितीकडे असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी हेत्या. परंतु त्या रेडीरेकनरपेक्षा कमी दरात विकून संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत.