शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मतदान याद्या ऐनवेळी बदलल्याने संभ्रम

By admin | Updated: February 21, 2017 00:54 IST

पालिकेचा गोंधळ : निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुधारणेचे आश्वासन

नाशिकरोड : मनपा निवडणुकीत प्रभाग २० व २१ च्या मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना निवडणूक विभागाकडून झालेल्या चुकीमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. निवडणूक शाखेकडून अंतिम मतदार यादी गेल्या बुधवारी १५ फेब्रुवारीला संकेत स्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवारांना सीडीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग २० व २१ मधील उमेदवार, पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अंतिम मतदार यादीनुसार प्रचाराचे व मतदान स्लिपा वाटण्याचे नियोजन केले. राजीव गांधी भवनामधून प्रभाग २० व २१ च्या दोन सिडींची विक्रीदेखील झाली होती. मात्र निवडणूक विभागाला गेल्या गुरूवारी या दोन प्रभागातील काही मतदान खोल्यांचे ‘पेजशीट’ बदलण्याचे राहून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ती चुक सुधारली.  तसेच ज्या दोन सिडी विक्रीस गेल्या होत्या त्यांच्याशी संपर्क साधून त्या दोन सीडी जमा करण्यात आल्या. मात्र या दोन दिवसाच्या काळात उमेदवार, प्रचार समिती आदिंनी संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रभाग २० व २१ ची मतदार यादी मिळवून त्यानुसार काम सुरू केले. ज्या दोन सिडी विक्रीस गेल्यानंतर त्या पुन्हा ताब्यात मिळेपर्यंत तिच्या किती कॉपी करण्यात आल्या हे मात्र स्पष्ट झाले नाही. निवडणूक विभागाला झालेली ही चूक लक्षात आल्यानंतर ती तत्काळ सुधारण्यात आली.  मात्र त्याबाबत उमदेवार आणि मतदारांना अवगत केले गेले नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसारच सर्वच उमेदवार, पक्ष, कार्यकर्ते प्रचाराला लागले होते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गेल्या २ - ३ दिवसांपासून त्या मतदार यादीनुसार उमेदवारांचे कार्यकर्ते घरोघरी मतदार स्लिपा वाटत आहे. निवडणूक शाखेकडूनदेखील मतदान स्लिपा वाटण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी प्रभाग २० व २१ मध्ये काही मतदारांना पक्षीय उमेदवार व निवडणूक शाखेकडून मिळालेली मतदानाच्या स्लिपमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली. मतदान यादी प्रसिद्ध करताना झालेला गोंधळ लक्षात येताच दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप व इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी निवडणूक विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेऊन समेट घडवत नवीन मतदार यादीचा डाटा देण्याचे सांगितल्यानंतर वाद मिटला. यामुळे मात्र उमेदवार व पक्षांनी मतदारांना घरोघर वाटलेल्या वाटलेल्या मतदानाच्या स्लिपा चुकीच्या ठरल्या असुन उमेदवारांना नवीन स्लिपा वाटण्याची पाळी आली आहे. प्रभाग २० मध्ये खोली क्र. ८ ते ३३ या २६ खोल्या व प्रभाग २१ मध्ये खोली २१ ते २९ या ९ खोल्यांमध्ये असलेल्या मतदानाच्या उमेदवारांनी वाटलेल्या स्लिपा चुकीच्या ठरल्या असून, त्यांचे मतदान केंद्र व खोल्या बदलल्या गेल्या आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा मतदान कुठे करायचे म्हणून चांगलाच गोंधळ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)