शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सदोष वार्षिक ताळेबंद, सनदी लेखापालची गच्छंती

By admin | Updated: November 13, 2016 00:02 IST

महापालिका : नवीन नियुक्तीची प्रक्रिया सुरू

नाशिक : महापालिकेचा सदोष वार्षिक ताळेबंद सादर केल्याप्रकरणी सनदी लेखापालला दिलेले कंत्राट आयुक्तांनी रद्दबातल ठरविले असून, नव्याने नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. सुमारे आठ वर्षांपासून करण्यात येणाऱ्या द्विनोंद लेखापद्धतीचे कामकाज सदोष आढळून आल्याने आयुक्तांनी सदर कारवाई केली आहे.महापालिकेने एप्रिल २००७ पासून एस. एस. मुथा या सनदी लेखापालास द्विनोंद लेखापद्धतीनुसार वार्षिक ताळेबंद सादर करण्याचे कंत्राट दिले होते. सदर लेखापालने सुरुवातीच्या काही वर्षांचे ताळेबंद सादर केले, परंतु त्यांची त्रयस्थ एजन्सीमार्फत पडताळणी केली असता त्यात अनेक त्रुटी-दोष आढळून आले. त्यामुळे मुथा यांना महापालिकेने वेळोवेळी समज देऊन संधीही देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कामकाज करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे विलंब होत गेला. परिणामी, महापालिकेचे गेल्या ८ ते ९ वर्षांपासून द्विनोंद लेखापद्धतीनुसार वार्षिक ताळेबंदचे कामच झालेले नाही. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबत गंभीर दखल घेत दि. २८ आॅक्टोबर रोजी आदेश पारीत करत एस. एस. मुथा यांचे कंत्राट रद्द केले आणि त्यांची गच्छंती केली. याशिवाय त्यांची अनामत रक्कम जप्त करण्याचीही कारवाई केली. आता महापालिकेने द्विनोंद लेखापद्धतीनुसार वार्षिक ताळेबंदचे काम करण्यास नवीन सनदी लेखापाल नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध केली आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून महापालिकेचे काम द्विनोंद लेखापद्धतीविना होत असल्याने एकूणच आर्थिक कामकाजाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)