मुखेड परिसरात पाण्याच्या शोधार्थ हरणांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:14 AM2018-03-28T00:14:37+5:302018-03-28T00:14:37+5:30

येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात  मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे.

Deer runway looking for water in the mouth area | मुखेड परिसरात पाण्याच्या शोधार्थ हरणांची भटकंती

मुखेड परिसरात पाण्याच्या शोधार्थ हरणांची भटकंती

Next
ठळक मुद्दे पाण्याच्या शोधात हरणांचे कळप थेट शेतातकळपातील काही हरणे कुत्र्यांची शिकार झाले वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज

मानोरी : येवला तालुक्यात उन्हाची लाट दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रब्बी पिकांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून, शेतात असलेली हरभरा, कांदे, गहू आदी पिके काढून झाली असून, गवताच्या रूपात  मोठ्या प्रमाणात चाऱ्याची निर्मिती झाली आहे. याच चाºयाच्या व पाण्याच्या शोधात हरणांचे कळप थेट शेतात येत असल्याचे मुखेड व जळगाव नेऊर परिसरात दिसून येत आहे. मुखेड परिसरात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप पाहिल्याचे येथील शेतकºयांकडून सांगण्यात येत  आहे. जळगाव नेऊरच्या परिसरातसुद्धा हरणांचे दर्शन होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आहे. उभ्या पिकांची जसजशी सोंगणी केली जात आहे, तसतशी हरणांच्या निवायाची धास्ती वाढत चालली आहे. हरणांच्या कळपातील काही हरणे कुत्र्यांची शिकार झाले असून, काही जखमीसुद्धा झाल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले आहे. रस्ता ओलांडताना अनेकदा हरणांची पिले वाहनांना धडकून जखमी होतात. जळगाव नेऊर ते सत्यगाव  रस्त्याने प्रवास करणारे अनेक चालक हरणांना पाहण्यासाठी वाहन थांबवून आनंद घेत आहेत. पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ वाढत चाललेल्या हरणांच्या भटकंतीमुळे वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने गांभीर्याने लक्ष घालून उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सत्यगाव, मुखेड, भिंगारे येथे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाचा पाणी हा मुख्य स्रोत असल्याने हरणांचा मुक्काम उसातच असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले आहे. भर दिवसा कांदे काढत असताना मोकळ्या शेतात भटकंती करत गवत खाताना हरीण शेतकºयांजवळून न घाबरता फिरतात.

Web Title: Deer runway looking for water in the mouth area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.