शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उंबरपाडा (सु) येथील विलगीकरण केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 00:09 IST

सुरगाणा : येथून जवळच असलेल्या उंबरपाडा (सु) येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ७२ बेडची सुव्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी नऊ रूग्ण या नवीन विलगीकरण केंद्रात दाखल झाले.

ठळक मुद्देविद्यालय विलगीकरण केंद्र म्हणून उपलब्ध करून दिले

सुरगाणा : येथून जवळच असलेल्या उंबरपाडा (सु) येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ७२ बेडची सुव्यवस्था असलेल्या विलगीकरण केंद्राचे लोकार्पण सहायक पोलीस निरीक्षक सागर नांद्रे यांचे हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी नऊ रूग्ण या नवीन विलगीकरण केंद्रात दाखल झाले.होम क्वारंटाईन रूग्णांपासून कोरोना संसर्ग पसरू नये तसेच रूग्णांना तत्पर सेवा मिळावी या उद्देशाने माजी आमदार गावित यांनी उंबरपाडा (सु) येथील त्यांचे विद्यालय विलगीकरण केंद्र म्हणून उपलब्ध करून दिले आहे. पॉझिटिव्ह मात्र होम क्वारंटाईन राहणाऱ्या रूग्णांनी घरी किंवा शेतात जाऊन राहण्याऐवजी उंबरपाडा येथील विलगीकरण केंद्रात दाखल व्हावे यासाठी सर्व सुविधा मोफत दिली आहे. याठिकाणी रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी देखरेख राहणार असून आयुर्वेदिक उपचार देखील केले जाणार आहेत. तसेच एकवेळ नाश्ता, दोन वेळचे जेवण अगदी मोफत दिले जाईल. एक नातेवाईक थांबल्यास त्या व्यक्तीला देखील मोफत जेवण व राहण्याची सोय असणार आहे. शनिवारी (दि.१५) पहिल्याच दिवशी दोन रुग्ण या विलगीकरण केंद्रात दाखल झाले.कोरोना संसर्ग व त्यावरील लसीबाबत तालुक्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत. कोरोना व त्याच्या उपचारासंबंधी माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील. आजार झाल्यास अंधश्रद्धा ठेवून भगत्याकडे जाऊ नका. ते भगत देखील आजारी पडले. कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. मी गावागावात जाऊन कोरोना संसर्ग व त्यावर उपाय म्हणून निघालेल्या लसीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून तालुक्यात लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जे.पी.गावित यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी डॉ. दिनेश चौधरी, डॉ. कमलेश जाधव, उपसभापती इंद्रजित गावित, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सावळीराम पवार, उत्तम कडू, संतोष बागुल, सुरेश गवळी, हिरामण गावित, योगेश थोरात, वसंत गवळी, मोहन पवार, अब्बास शेख आदी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत