नाशिक : चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील औषधनिर्माण अधिकाऱ्याच्या १९ वर्षीय मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़३) दुपारी सिडको परिसरात घडली़ आशुतोष अनिल भाटीवाल (१९, रा़ भाद्रपद सेक्टर, स्वामी समर्थनगर, सिडको, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे़औषधनिर्माण अधिकारी अनिल भाटीवाल यांचा मुलगा आशुतोष हा दुपारी दोन वाजेच्या सुमारास सिडको परिसरातून दुचाकीने जात होता़ सावतानगरजवळ त्याची दुचाकी घसरून अपघात झाला़ यामध्ये त्याच्या डोक्यास व पोटास जबर मार लागल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}