शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाड्यानेच कुंभमेळ्यापुरते कॅमेरे बसविण्याचा निर्णय

By admin | Updated: February 3, 2015 01:24 IST

भाड्यानेच कुंभमेळ्यापुरते कॅमेरे बसविण्याचा निर्णय

नाशिक : कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करून ते शहराच्या प्रमुख ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी बसविण्यासाठी पुरेसा कालावधी नसल्याचे सांगणाऱ्या पोलीस विभागाने अखेर भाड्यानेच कुंभमेळ्यापुरते कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला तर अव्हेरलेच; परंतु भाड्याने कॅमेरे बसविण्याचे ज्या कारणावरून समर्थन केले जात आहे ते पाहता, पालकमंत्र्यांनी सूचना करून महिना उलटून कॅमेऱ्याची निविदा न काढता त्यांचीही दिशाभूूल केली आहे. पोलीस खात्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत असलेली भूमिका पाहता, भाड्याने कॅमेरे लावून ठेकेदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याची लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होणारी भीती खरी ठरते की काय, अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे. नाशिक शहराचे धार्मिक व अन्य महत्त्व लक्षात घेता, संभाव्य दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर व सिंहस्थ कुंभमेळा डोळ्यासमोर ठेवून, शहरातील प्रमुख ठिकाणी कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करून बसविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या कुंभमेळा शिखर परिषदेत पोलीस यंत्रणेस केली होती. त्यासाठी निधीची तरतूद करण्यासही सहमती दर्शविली होती. डिसेंबरमध्ये नाशिक दौऱ्यावर येऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करून ते बसविण्याचा पुनरुच्चार करतानाच, भाड्याने कॅमेरे बसविण्यामागे सरकारचे नुकसान असल्याची टिप्पणीही केली होती. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेले नियोजन पाहता, पोलीस यंत्रणेकडून कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील अशी अपेक्षा वाढीस लागलेली असतानाच, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी कॅमेरे खरेदीची निविदा काढणे, त्याची प्रक्रिया राबविणे, कॅमेरे खरेदी करणे व प्रत्यक्षात बसविणे या साऱ्या बाबींसाठी पुरेसा कालावधी नसल्याचे एकमेव कारण पुढे करून कॅमेरे खरेदी न करता भाड्यानेच ते बसविण्याची पुरेपूर मानसिकता पोलीस यंत्रणेने केली व ते सरकारच्याच पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील गृहखात्याच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे, जानेवारीच्या पहिल्याच तारखेला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय सिंहस्थ कुंभमेळा बैठकीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निविदा तत्काळ काढण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या होत्या व पालकमंत्र्यांच्या आदेशाबरहुकूम आठ दिवसांत ही सारी प्रकिया पूर्ण करण्याचे छातीठोक आश्वासनही पोलीस यंत्रणेने दिले होते. दरम्यान, पुन्हा एकदा पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत कुंभमेळा आढावा बैठक होऊन त्यात पुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा विषय छेडला गेला असता, बैठकीस उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी भाड्याने कॅमेरे बसविण्याच्या पोलीस यंत्रणेच्या पद्धतीवर हरकत घेऊन, ठेकेदार यात ‘गोलमाल’ करण्याची भीती व्यक्त केली होती. चार ठिकाणी कॅमेरे बसवून ठेकेदार दहा ठिकाणचे पैसे घेईल, त्याचबरोबर शासकीय यंत्रणेने सहकार्य न केल्याचे कारण पुढे करून ऐनवेळी कॅमेरे बंद पडल्याचे ठेकेदार सांगू शकतो, असा अंदाजही लोकप्रतिनिधींनी वर्तविला. परंतु त्याचे समाधान पोलीस यंत्रणा करू शकली नाही. त्यामुळे बसविण्यापूर्वीच विविध पातळ्यांवर गाजत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निविदा अद्यापही पोलीस खाते काढू शकलेले नाही. त्यामागे तांत्रिक कारणे पुढे केली जात असली तरी, जर पोलीस यंत्रणेची सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबतची काही तयारीच झालेली नसेल, तर सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करून म्हणजेच स्वमालकीचे बसविण्याइतपत वेळ हाती नसल्याचा केला जात असलेला दावा कितपत खरा मानावा? (प्रतिनिधी)