शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू

By admin | Updated: February 7, 2017 01:27 IST

दुर्घटना : येवला-नगरसूल मार्गावर अपघात

येवला : सायकलस्वाराला मोटारसायकलने धडक दिल्याने सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना येवला-नगरसूल चौफुलीवर घडली. येवला तालुक्यातील नगरसूल येथील रेल्वे स्टेशनवर राहणारे एकनाथ गंगाधर चव्हाण (५०) हे सायकलवर दळण दळण्यासाठी नगरसूल गावात जात असताना, येवला-नगरसूल रस्त्यावरील चौफुलीवर नांदगावकडून येवल्याकडे जाणाऱ्या मोटारसायकलने (एमएच ४१ एजे ७७१४) धडक दिली. या धडकेत एकनाथ चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांच्यावर नगरसूल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पाटील यांनी उपचार केले. दरम्यान, गंभीर अवस्थेत चव्हाण यांना नाशिकला हलविले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलचालक विश्वनाथ जगन्नाथ भुसारे (३८), दत्तू नामदेव वाघ (४०), साकराबाई काशीनाथ भुसारे (६०) हे सर्व सावरगाव (ता. नांदगाव) येथील आहेत. विश्वनाथ भुसारे व साकराबाई भुसारे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास नगरसूलचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरासे, पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे करीत आहेत. (वार्ताहर)