आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह दिरास अटक

By Admin | Updated: November 14, 2016 01:47 IST2016-11-14T01:22:37+5:302016-11-14T01:47:16+5:30

आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह दिरास अटक

Dearas arrested with a husband who is motivated by suicide | आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह दिरास अटक

आत्महत्त्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह दिरास अटक

 नाशिक : माहेरून दोन लाख रुपये आणावेत, तसेच विवाहात संसारोपयोगी साहित्य आणले नाही म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या छळास कंटाळून जेलरोड येथील विवाहिता कल्पना भगत (४०, रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) यांनी शुक्रवारी (दि.११) आत्महत्त्या केली़ विवाहितेला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी पती विजय भगत व दिरास अटक केली आहे़ याप्रकरणी कल्पना यांचे पिता निकुंज नारायण महायावंशी (३०, रा. बलसाड, गुजरात) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे़ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १९ फेब्रुवारी २००४ ते ११ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत पती विजय भगत, दीर भरत नारायण भगत (दोघे रा. पेंढारकर कॉलनी, जेलरोड) व हेमलता राजेश भगत (रा. दावरी, गाजरिया, जि. बलसाड) हे नेहमी कुरापत काढून छळ करीत होते़ या छळास कंटाळूनच कल्पनाने आत्महत्त्या केल्याचा आरोप तिच्या पित्याने केला आहे़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भगत बंधूंसह हेमलता भगत हिच्याविरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dearas arrested with a husband who is motivated by suicide