शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

आजचा दिवस महत्त्वाचा

By admin | Updated: February 20, 2017 00:19 IST

प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवण्यासाठी खबरे नियुक्त

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असताना निवडणूक रिंगणातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची कोणतीही कसूर न ठेवता स्वत:ला झोकून देतानाच, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डावपेच व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खास खबऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती काढण्याबरोबरच पैसे, वस्तंूच्या वाटपावर लक्ष ठेवण्यात येत आहे.  महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांनी ‘अभी नही तो कभी नही’ असे समजून इतक्या गंभीरतेने निवडणुकीचा विषय हाताळण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातून उमेदवारी करताना पॅनलमध्ये कोण असावे, कोण नसावे, प्रतिस्पर्धी कोण आहे याचा अंदाज बांधण्याबरोबरच प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने हेरून ते खच्चीकरण करण्याचे प्रयत्न यापूर्वीच करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस पराकोटीला पोहोचल्याने कोणताही उमेदवार छातीठोकपणे दावा करण्यास पुढे येत नसल्याचे सर्वपक्षीय चित्र आहे. अशा परिस्थितीत जो तो आपल्यापरिने निवडून येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे.  काही उमेदवारांकडून पैशांचे वाटप तर काहींनी वस्तूंच्या रूपात भेटी द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी थेट सोसायट्या, बंगले, इमारती व अपार्टमेंटमधील एकूण मतदारांच्या संख्येत तितक्या खर्चाची कामे करून दिली असून, काही उमेदवारांनी निवडणुकीनंतर सहलींचे आयोजनही केले आहे. (प्रतिनिधी)एक-एक मताला महत्त्वमहापालिका निवडणुकीत विजयासाठी एकेक मत महत्त्वाचे असून, ते कमावण्यासाठी व न गमविण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असताना प्रतिस्पर्ध्यांच्या तंबूत नेमके काय चालले आहे, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे झाले असून, त्यासाठी आपल्यातीलच काहींना प्रतिस्पर्धी गोटात पाठवून माहिती काढण्यात येत आहे, तर काही उमेदवारांनी थेट खबऱ्यांची नेमणूक केली आहे. सोमवारचा दिवस व संपूर्ण रात्र सर्वच उमेदवारांसाठी ‘कत्तल की रात’ ठरणार असल्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या खेळीवर आपली व्यूहरचना करणे सोपे व्हावे यासाठी हे खबरे कमालीचे उपयोगी पडणार आहेत. त्यातल्या त्यात प्रतिस्पर्ध्याकडून पैसे, वस्तूंचे वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्याला अटकाव करणे शक्य होणार आहे.