शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० टक्के द्राक्षबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:02 IST

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत ...

ठळक मुद्देपाऊस, थंडीचा फटका : मण्यांच्या फुगवणीवर परिणाम

नाशिक : द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी झालेला अतिपावसामुळे ४० टक्केबागांचे नुकसान झाले आहे. पावसानंतर सध्या पडत असलेल्या अतिथंडीमुळेही द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. निर्यातक्षम असलेल्या रंगीत द्राक्षांना युरोपात सध्या चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्यांकडे मालच नसल्याची माहिती महाराष्टÑ राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.जिल्ह्यात पावणेदोन लाख एकरावर द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते, तर राज्यात साडेतीन लाख एकर क्षेत्र द्राक्ष पिकाखाली आहे. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये आलेल्या पावसामुळे सटाणा भागातील अर्ली द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा द्राक्षनिर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, मागील वर्षी आतापर्यंत १४०० कंटेनर माल परदेशात गेला होता. यावर्षी मात्र आतापर्यंत १०५०-१०७० कंटेनरच गेले असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाचा द्राक्ष उत्पादनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून, ज्या बागांपासून ६ ते १० टनापर्यंत उत्पादन मिळते त्याच द्राक्षबागांपासून आज केवळ २ ते ३ टन माल निघत आहे. यावर्षी निर्यातक्षम द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. युरोपात पाठविल्या जाणाºया पांढºया द्राक्षांना ८५ ते ९५ रुपये किलो, तर रंगीत द्राक्षांना १०५ ते १२० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र शेतकºयांकडे हा मालच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची संख्याही पाच ते सहा हजाराने कमी झाली असून, यावर्षी फक्त ३१ हजार शेतकºयांनी नोंदणी केली आहे, असे ते म्हणाले.सध्या पडत असलेल्या थंडीचाही द्राक्षांवर परिणाम होत असून, थंडीमुळे क्रॅकिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. थंडीमुळे द्राक्ष मण्यांच्या आकारावरही परिणाम झाला आहे. नाशिक जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक असून, त्या तुलनेत सांगली, सोलापूर भागात नुकसान कमी आहे. त्या भागात छाटणी उशिरा होत असल्याने तेथील बागांना तसा फारसा धोका झाला नाही, अशी माहिती भोसले यांनी दिली.शेतकरी झाले सतर्कबदलत्या वातावरणामुळे द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. फवारणीचे प्रमाण वाढले तरी द्राक्षांमध्ये केमिकलचे प्रमाण काहीच जाणवत नाही. यावरून द्राक्ष उत्पादक शेतकरी किती सतर्क झाले आहेत याची प्रचिती येते, असे भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस