सायखेडा मंडलातील गावांचा दुष्काळ यादीत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:58 PM2018-11-16T22:58:57+5:302018-11-17T00:23:30+5:30

भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने घोषित केलेल्या तालुक्यांमधून निफाड तालुक्याला दुष्काळ जाहीर झालेल्या यादीतून वगळण्यात आले होते; मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये निफाड तालुक्यातील सायखेडा मंडल कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.

In the Dakshak list of villages in Sikheheda Mandal | सायखेडा मंडलातील गावांचा दुष्काळ यादीत समावेश

सायखेडा मंडलातील गावांचा दुष्काळ यादीत समावेश

Next

सायखेडा : भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने घोषित केलेल्या तालुक्यांमधून निफाड तालुक्याला दुष्काळ जाहीर झालेल्या यादीतून वगळण्यात आले होते; मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये निफाड तालुक्यातील सायखेडा मंडल कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यात गोदावरी आणि कादवा नदीच्या खोऱ्यामध्ये शेती असल्याने या गावांना पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असा ढोबळ अंदाज करून तालुक्याला दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता; मात्र निफाड तालुक्यात असले तरी सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील सायखेडा मंडल अंतर्गत येत असलेले भेंडाळी, तळवाडे, महाजनपूर, बागलवाडी, पिंपळगाव निपाणी, बेरवाडी या गावांना सिंचनाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने वर्षानुवर्षे दुष्काळ असतो; मात्र केवळ निफाड तालुक्यात असल्याने यासंदर्भात कोणताही शासन निर्णय झाला तरी फायदा होत नाही.

Web Title: In the Dakshak list of villages in Sikheheda Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.