डाबलीतील शेतकरी जाणार संपावर

By Admin | Updated: April 8, 2017 23:34 IST2017-04-08T23:33:45+5:302017-04-08T23:34:08+5:30

मालेगाव : तालुक्यातील डाबली येथील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी१ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Dabali farmers can strike | डाबलीतील शेतकरी जाणार संपावर

डाबलीतील शेतकरी जाणार संपावर

 मालेगाव : तालुक्यातील डाबली येथील शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी
१ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भात घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला.
ग्रामशक्ती संघटनेचे राजेंद्र वाघ, रावसाहेब निकम, सचिन निकम, विठ्ठल अहिरे, मधुकर देवरे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. त्यात शेतकऱ्यांकडून १ जूनपासून संपावर जाण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामशक्ती शेतकरी बचाव संघर्ष यात्रेची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यासह तालुक्यातील गावागावात ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
येत्या १ जूनपासून पोटापुरती शेती पिकवा, खुशाल संपावर जा, असे आवाहन करण्यात आले. ग्रामसभेस अविनाश निकम, मधुकर चौधरी, लखन खैरनार, सीताराम निकम, एकनाथ वाघ, जिभाऊ देवरे, हिरालाल चौधरी, ज्ञानेश्वर सुपारे, मनीष खैरनार, पप्पू अहिरे, समाधान निकम, संजय बोरसे, बारकू पवार, वसंत चौधरी, मोठाभाऊ निकम, विठोबा निकम उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dabali farmers can strike