शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या चक्रव्यूहात ‘कालिदास’

By admin | Updated: January 20, 2017 00:56 IST

नाट्यकर्मींचे हाल : प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

नाशिक : सांस्कृतिक नाशिकचा मानबिंदू ठरलेल्या नाशिक महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरची रया गेली असून, समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या कालिदास कलामंदिरचा जीर्णोद्धार कधी होणार? असा प्रश्न आता राज्यभरातील रंगकर्मींना पडला आहे. बुधवारी रात्री कालिदासच्या दुरवस्थेने त्रस्त झालेले नाट्यअभिनेता प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावरच या नाट्यगृहाच्या दुरवस्थेची छायाचित्रे टाकून महापालिकेची इभ्रतच वेशीला टांगली आहे. आता तरी त्याची दखल घेऊन सत्ताधिकारी आणि प्रशासन कार्यवाही करणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर हे एकमेव एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह आहे, परंतु त्याची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसल्याने त्याची रया गेली आहे. नाट्यप्रेमी आणि कलावंतांनी वेळोवेळी तक्रारी केल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत वातानुकूलन संयत्र बंद असणे, खुर्च्यांची दुरवस्था, पडदा व्यवस्थित न सरकणे असे अनेक विषय चर्चेला आले असून, कालिदासला पूर्णत: सुस्थितीत आणण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. बुधवारी (दि.१८) रात्री प्रशांत दामले यांची भूमिका असलेले ‘साखर खालेल्ला माणूस’ हे नाटक होते. त्यावेळी या नाट्यगृहाचे दरिद्र्य दर्शन घडले. त्यावेळी दामले यांनी ही छायाचित्रे काढून व्हॉट््स अ‍ॅपचे विविध ग्रुप आणि फेसबुकवर शेअर केले. ‘नाशिक महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरच्या नाट्यगृहातील भीषण वास्तव, कसे प्रयोग करणार, कसे येणार रसिक, कसं रंगणार नाटक, ‘गेली अनेक वर्षे प्रयत्न करूनही हीच अवस्था’ असे त्याखाली नमूद केले असून, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. महाकवी कालिदास कलामंदिरमधील बेसिनची दुरवस्था, अस्वच्छता, प्रसाधनगृहातील घाण, तुटक्या खुर्च्या ही अवस्था त्यातून व्यक्त झाली आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे प्रशांत दामले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या नाट्यगृहात मुळात नाटक या विषयाचा जाणकार व्यवस्थापक असायला हवा, परंतु तो नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेने किमान देखभाल दुरुस्ती केली पाहिजे, परंतु ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)