शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी रमजाननिमित्त बाजारपेठेत गर्दी

By admin | Updated: July 28, 2014 00:49 IST

मदत : पोलीस दलातर्फे खाद्यपदार्थांचे वाटप

आझादनगर : रमजान ईदनिमित्ताने शहरातील सर्व बाजारपेठा मुस्लीमबांधवांच्या गर्दीने फुलली असून, अंतिम टप्प्यात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दीने वाहतुकीस खोळंबा होत आहे. मुस्लीमबहुल भागातील दुकाने सुमारे २० तास खुली ठेवण्यात आली आहेत.कपडे, पादत्राणे, टोपी, रुमाल घरातील शोभेची वस्तूसह विविध साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. ईद दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे बाजारात गर्दी उसळली आहे. कापडाच्या किमती व शिलाईच्या दरामुळे तरुणवर्ग कपडे शिवून घेण्यापेक्षा रेडिमेड कपडेच घेणे पसंत करतात. ईदसाठी लागणारे साहित्य, पदार्थ, सुकामेवा यांची किदवाईरोड व मोहंमदअलीरोड, सरदार थिएटर रस्त्यावर हातगाडी लावून दुभाजक तयार झाला आहे. यामुळे वाहनांना येण्यास मज्जाव करण्यात येते. पोलीस दलातर्फे रमजाननिमित्त उपेक्षितांना पदार्थ वाटपआझादनगर : मालेगाव पोलीस दलातर्फे समाजातील उपेक्षितांना रमजान ईदनिमित्त आवश्यक पदार्थांचे वाटप करण्यात आले. दुपारी १२ वाजता नियंत्रण कक्षातील सुसंवाद हॉल येथे त्याचे वाटप करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनित शहा, डॉ. रमेश चोपडे होते.समाजात प्रत्येक मनुष्य जन्मास येतो. त्यास सर्वप्रथम हात लावणारी दायी ते मृत्यूसमयी त्यांचा पुकारा करणारा, कबर खोदणारा व दफण करणारा अशा संपूर्ण जीवनात विविध अत्यावश्यक कामे करणारा हाही एक मनुष्यच असतो; परंतु त्याकडे सर्वच समाजाकडून दुर्लक्ष केले जाते. समाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वर्गातील सर्वच समाजातील स्त्री-पुरुषांचा मालेगाव पोलिसांकडून रेझिंगडेच्या समारोपावेळी सत्कार करण्यात आला होता. आज त्यातील मुस्लीम स्त्री-पुरुषांना ईदनिमित्ताने शिरखुर्मासाठी आवश्यक पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपअधीक्षक माधव सवई, महेश चिमटे, पोलीस निरीक्षक मसुद खान, अजय वसावे, आदिनाथ बुधवंत, शिवाजी कुरकुटे यांच्यासह रियाज अन्सारी, सलीम रिजवी, सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.