शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांना जातच नसते

By admin | Updated: September 5, 2016 01:27 IST

नागराज मंजुळे : बाबासाहेब विचार संमेलन उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : कोणत्याही गुन्हेगारी कृत्यामागे केवळ त्या व्यक्तीची गुन्हेगारी प्रवृत्ती असते, त्याचा कोणत्याही जातीशी संबंध नसल्याचे सांगत कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींनाही कोणतीही जात नसून ते गुन्हेगाराच असल्याचे मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.रावसाहेब सभागृहात बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर श्रीपाद जोशी, नागपूर संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे, संमेलनाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, स्वागताध्यक्ष मनीषा जगताप, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, माजी नगरसेवक हेमलता पाटील आदि उपस्थित होते. यावेळी मंजुळे यांनी समाजातील विकृत प्रवृत्तींवर भाष्य करताना फटकेबाजी केली. ते म्हणाले, विविध ठिकाणी असलेले महापुरुषांचे पुतळे, स्मारक यांच्या विटंबनेच्या कारणामुळे आंदोलन करणाऱ्या अनेकांना प्रत्यक्ष वस्तुस्थितीविषयी माहिती नसल्याचे समोर येते. त्यामुळे पुतळे, स्मारकांसाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करण्याची गरज आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यांनी नव्हे तर त्यांच्या पुस्तकाने समाजात परिवर्तन घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मिरवणुका बंद कराव्यातडॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त डीजेच्या तालावर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकींमध्ये झिंगाटसारख्या गाण्यावर तरुणाई थिरकते. मात्र त्यातून महापुरुषांच्या विचारांचा प्रसार कसा होऊ शकतो. या मिरवणुकांमुळे केवळ विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अभ्यासक आदि विविध घटकांनाच त्रास होतो. डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने होणारे ध्वनिप्रदूषण हे एकप्रकारचे पॅसिव्ह स्मोकिंग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अशा मिरवणुका बंद करायला हव्यात, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.