विनामास्क फिरणाऱ्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 08:05 PM2021-02-20T20:05:39+5:302021-02-21T01:19:42+5:30

देवळा : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कलम १८८ अन्वये विना मास्क फिरणाऱ्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी दिली आहे.

Crimes registered against 26 persons walking around without masks | विनामास्क फिरणाऱ्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल

विनामास्क फिरणाऱ्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल

Next
ठळक मुद्देदेवळा तालुका : पोलिसांकडून मोहीम, सद्यस्थितीत १६ रुग्ण

देवळा : शहरासह तालुक्यात पुन्हा कोरोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कलम १८८ अन्वये विना मास्क फिरणाऱ्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी दिली आहे. देवळा तालुक्यात सदर मोहीम यापुढे सुरू राहणार आहे. देवळा तालुक्यात सद्यस्थितीत १६ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना मुक्त असलेल्या देवळा शहरात गतवर्षी २८ जूनपासून कोरोनाचे रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली. परंतु महसुल विभाग, नगरपंचायत प्रशासन, व आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेत तातडीने पाऊल उचलले. देवळा शहरातील कोरोना रूग्ण सापडलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करून सील केला. अशीच कारवाई ग्रामीण भागात देखील करण्यात येऊन गावांचा संपर्क तोडण्यात आला. मास्क, शारीरिक अंतर, स्वच्छता आदी गोष्टींचे कटाक्षाने पालन करण्याबाबत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरीकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळाले व तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या मर्यादित राहून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याचा धोका टळला होता. आता पुन्हा धोका वाढू लागल्याने तालुका कोरोना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबले असून देवळा पोलिसांनी तोंडाला मास्क नसलेल्या २६ व्यक्तिंवर गुन्हे दाखल केले आहेत. ह्या मोहीमेत पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंड कर, अंकुश हेंबाडे, संदीप चौधरी, शरीफ शेख, अरूण आहीरे, एल के. धोक्रट आदी पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रशासनाचे आवाहन
गतवर्षी लॉक डाऊन काळात देवळा नगर पंचायत प्रशासनाने व पोलिसांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करतांना मास्कचा वापर न करणाऱ्या, व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे नागरीकांना शिस्त लागली होती व कोरोनाच्या संसर्गापासून शहर दूर राहीले होते. देवळा शहरात पुन्हा कोरोनाचे रूग्ण सापडू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून नागरीकांनी स्वयंशिस्त पाळून कोरोना संसर्गापासून बचाव करावा असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी केले आहे.

यांच्यामुळे आहे धोका!
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या नागरीकांना वारंवार थुंकावे लागते. थुंकण्यातून कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होतो. वारंवार थुंकावे लागत असल्यामुळे हे नागरीक मास्कचा वापर करीत नाहीत. नियमांचे पालन न करणाऱ्या व शहराचे सौंदर्य, व आरोग्य धोक्यात आणणाऱ्या ह्या नागरीकांमुळे शहरात कोरोनाच्या संसर्ग वाढीचा धोका आहे.

Web Title: Crimes registered against 26 persons walking around without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.