कोरे चेक घेण्याऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यांवर गुन्हा

By Admin | Updated: January 14, 2017 01:02 IST2017-01-14T01:02:31+5:302017-01-14T01:02:45+5:30

बळाचा वापर : अतिरिक्त बिलाचा प्रकार

Crime against hotel employees taking a blank check | कोरे चेक घेण्याऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कोरे चेक घेण्याऱ्या हॉटेल कर्मचाऱ्यांवर गुन्हा

 नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर हॉटेल ज्युपिटरमध्ये लग्नसमारंभाच्या निमित्ताने राखीव खोल्यांव्यतिरिक्त नातेवाइकांना हॉटेलचा अतिरिक्त वापर केल्याचे सांगत हॉटेलच्या व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांनी ठाणे येथील एका ग्राहकाकडून अतिरिक्त बिलाची मागणी करीत बळाचा वापर करून त्यांच्याकडील कोऱ्या चेकवर सह्या करून घेत दम दिल्याची घटना घडली आहे.
ठाणे शहरातील पोखरण रोड परिसरात लक्ष्मी नारायण रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या रघुनाथ मधुकर गवळी यांनी येथे राहणाऱ्या एका इसमाने १५ खोल्या बुक केल्या होत्या. परंतु त्यांच्या नातेवाइकांकडून हॉटेलचा अधिक वापर केल्याचे सांगत हॉटेलच्या व्यवस्थापकांनी अधिक बिल आकारल्याची तक्रार गवळी यांनी केली आहे. या प्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक तथा कर्मचाऱ्यांनी जागेवर पैसे देण्याची मागणी करीत हॉटेलचे गेट बंद करून कोऱ्या चेकवर सही करून घेऊन सदर चेक बँकेत जमा करण्याचा दम दिल्याची फिर्याद गवळी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
नाशिकच्या माहिती आयुक्तपदी बिष्णोई
नाशिक : राज्य माहिती आयोग, नाशिक खंडपीठाच्या माहिती आयुक्त पदाचा कार्यभार के. एल. बिष्णोई यांनी स्वीकारला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत अधिसूचना निर्गमित केली होती. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने बिष्णोई यांची नाशिक खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदावर पदस्थापना केली आहे. असे राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिकचे उपसचिव सु. सा. चौधरी यांनी पत्राद्वारे कळवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against hotel employees taking a blank check