शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणापूर्वीच कोसळले विमान; यंत्रणा ४५ मिनिटांत सज्ज

By admin | Updated: July 16, 2017 00:04 IST

आपत्ती व्यवस्थापनाची हाताळणीची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा रन-वे वर विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच कोसळल्याची रंगीत तालीम घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दोन आठवड्यांपूर्वी ओझरच्या विमानतळावरून अतिरेक्यांनी प्रवाशांनी भरलेले विमान अपहरण केल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाची हाताळणीची रंगीत तालीम यशस्वी झाल्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा रन-वे वर विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच कोसळल्याची रंगीत तालीम घेण्यात आली. घटना घडल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत सर्व यंत्रणा सज्ज झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.  संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या ओझर विमानतळाची सुरक्षा तितकीच महत्त्वाची असून, त्या संदर्भात वेळोवेळी आढावा घेतला जात असताना त्याचाच भाग म्हणून विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पाहणाऱ्या यंत्रणांकडून रंगीत तालीम घेतली जात आहे. शनिवारी रन वे वर विमान कोसळल्याची घटना घडल्याचा निरोप सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना आला व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित झाली. विमान कोसळल्यामुळे प्रवासी जखमी झाल्याने तत्काळ रुग्णवाहिका व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, त्यानुसार दोन रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी रवाना झाले. त्याचबरोबर परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. जखमींवर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली.  आपत्ती व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या सर्व यंत्रणांनी अवघ्या ४५ मिनिटांत परिस्थिती हाताळली. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एचएएलचे विजय किंकरे हे अधिकारी स्वत:च जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षात बसून होते. दुर्घटनेचा दूरध्वनी आल्यापासून ते परिस्थिती हाताळल्यापर्यंत यंत्रणांनी किती झपाट्याने प्रतिसाद दिला त्याबाबतची प्रत्येक नोंद घेण्यात आली.