फटाके फोडण्याच्या कारणावरून मारहाण

By Admin | Updated: November 14, 2015 23:53 IST2015-11-14T23:50:35+5:302015-11-14T23:53:32+5:30

आगर टाकळी : पोलिसांनाही धक्काबुक्की

The crackdown on crackers broke | फटाके फोडण्याच्या कारणावरून मारहाण

फटाके फोडण्याच्या कारणावरून मारहाण

नाशिक : लहान मुलांनी रस्त्यावर फटाके फोडल्याचा राग येऊन टोळक्याने आगर टाकळीच्या वैदुवाडीतील पवार कुटुंबीयांस मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी १२ संशयितांवर जिवे ठार मारण्याचा तसेच महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, विजेंद्र बापू पवार ऊर्फ पिंटू यांच्यांशी संशयित सागर मनोहर ढवळे, सुगंध अनिल निर्मळ, मनोहर पंढरीनाथ ढवळे यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी भांडण केले होते़ बुधवारी वैदुवाडीत लहान मुले रस्त्यावर फटाके वाजवित असताना संशयितांनी त्यांना मारहाण केली़ त्यावेळी मुलांना मारू नका, असे पवार यांच्या सांगण्याचा राग आल्याने संशयित घरात घुसले़ त्यांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड, लोखंडी चाकू व दगडाने मारहाण करून पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला़ तसेच पवार यांच्या भावजयीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले तसेच दुचाकीचेही नुकसान केले़
यानंतर ढवळे यांनी उपनगर पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून संशयित राजेश दुर्गा पवार, भारत बाबूराव लोखंडे, बाबा पवार यांनी पंधरा-वीस साथीदारांसह लक्ष्मीबाई ढवळे यांना मारहाण करून वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले़ याप्रकरणी उपनगर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत़

Web Title: The crackdown on crackers broke