शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

देशव्यापी संप : गावपातळीवर टपालसेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:37 PM

जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती.

नाशिक : जिल्ह्यातील २६३ शाखा टपाल कार्यालयांमध्ये मंगळवारी (दि.१८) शुकशुकाट पसरला होता. सकाळी नियमितपणे ग्रामीण डाकसेवक कार्यालयांमध्ये टपालाचा बटवडा करण्यासाठी पोहोचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गावपातळीवरील टपालसेवा, पोस्ट बॅँकिंगसेवा ठप्प झाली होती.आपल्या विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन व नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक संघटनांच्या वतीने देशव्यापी संप पुकारला आहे. मे महिन्यात तब्बल १६ दिवस ग्रामीण डाकसेवक याच मागण्यांसाठी संपावर होते. तेव्हाही शासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे पुन्हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डाक विभागाने कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, ही या संपाची प्रमुख मागणी आहे. या मागणीचे आश्वासन मे महिन्यात शासनाकडून देण्यात आले होते; मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. सरकारने आश्वासनानंतर तोंडाला पाने पुसल्याने मंगळवार (दि.१८)पासून देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्णातील २६३ शाखा कार्यालयांमधील सुमारे ३७५ डाकसेवक या संपात सहभागी असल्याचा दावा आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन नाशिक विभागाचे सचिव सुुनील जाधव, विभागीय अध्यक्ष आर. एस. जाधव यांनी केला आहे. जोपर्यंत वरिष्ठ स्तरावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नसल्याची माहिती संबंधितानी दिली आहे....अशा आहेत मागण्या. कमलेशचंद्र समितीच्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात.च्युईटीची रक्कम ५ लाख रुपये करावी.सडीबीएसची कपात १० टक्के सरकारने जमा करावी व ईएसआय आणि ईपीएफची सेवा योजना अमलात आणावी.करीचा अनुभव लक्षात घेता बारा वर्षे सेवा बजावणाऱ्या डाकसेवकांना पदोन्नती द्यावी. दिवसांची पगार रजा दरवर्षी मिळावी.लांच्या शिक्षणासाठी दरवर्षी सहा हजार इतका भत्ता दिला जावा.पोझिट अलाउन्स रुपये ५०० वरून सोळाशेपर्यंत हा भत्ता जीडीएस कर्मचाºयांना द्यावा.डीएस कर्मचाºयांना ८ तासांचे काम देण्यात यावे तसेच प्रत्येकी कार्यालयात दोन माणसे नियुक्त करावीत.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसStrikeसंपNashikनाशिक