शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक पुत्राच्या नावाने खंडणी

By admin | Updated: November 14, 2015 23:54 IST

तिबेटीयन मार्केटमधील घटना : २० संशयितांवर गुन्हा दाखल

नाशिक : नगरसेवक पुत्राच्या नावाने २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करून ती पूर्ण न करणाऱ्या तिबेटीयन मार्केटमधील एका चायनीज विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयास बेदम मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडला़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरसबल बहादूर कुंवर (४३, किशोरचंद अपार्टमेंट, कॅनडा कॉर्नर) यांचे शरणपूर रोडवरील तिबेटीयन मार्केटमध्ये चायनीज विक्रीचे दुकान आहे़ दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास कुंवर दुकानावर काम करीत असताना संशयित विशाल शिरसाठ, जेम्स मायकल, सनी मोहिते, दीपक कांबळे, राजेश जेम्स, अजय पाटणकर, केशव वाधवा, विकास वाघमारे, चंदू दायजी, संदीप हे अन्य दहा साथीदारांसह आले़ त्यांनी दंगा करीत कुंवर यांच्याकडे दिवाळीसाठी २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली़ मात्र खंडणीची पूर्ण रक्कम न दिल्याने संशयितांनी ‘तू जॉय कांबळे याचा आदेश मानला नाही तर तुला संपवून टाकू’ अशी धमकी देऊन लोखंडी रॉड, दगडाने कुंवर यांना मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ यानंतर त्यांची पत्नी व मुलास मारहाण करीत विनयभंग केला़ तसेच दुकानातील खुर्च्या, टेबल व टपरीचे नुकसान केले़या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली़ या प्रकरणी कुंवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी वीस संशयितांविरोधात खंडणी, गैरकायद्याची मंडळी, दंगल, दहशत माजविणे, मारहाण करण्यासह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)