शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ

By admin | Updated: July 16, 2017 00:39 IST

नाशिक महापालिकेतील नगरसेवकांना आता दरमहा १५ हजार रुपये मानधन आणि त्याव्यतिरिक्त बैठकभत्ता प्राप्त होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वाढत्या महागाईचा फटका लोकसेवकांनाही बसणारच. प्रभागांमध्ये भटकंती, दूरध्वनीचा वापर, स्टेशनरी, टपाल यासाठी खिशाला लागणारी झळ कोणी सोसायची? त्यामुळेच शासनाने लोकसेवकांना खुशखबर दिली असून, महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला  आहे. नाशिक महापालिकेतील नगरसेवकांना आता दरमहा १५ हजार रुपये मानधन आणि त्याव्यतिरिक्त बैठकभत्ता प्राप्त होणार आहे.  शासनाने राज्यभरातील महापालिकांच्या नगरसेवकांचे मानधन सन २०१० मध्ये निश्चित केले होते. मात्र, वाढती महागाई लक्षात घेता नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, राज्याच्या नगरविकास विभागाने नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अ’ प्लस वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा २५ हजार, ‘अ’ वर्गातील महापालिका नगरसेवकांना दरमहा २० हजार, ‘ब’ वर्ग महापालिका नगरसेवकांना दरमहा १५ हजार तर ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेतील नगरसेवकांना दरमहा १० हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. नाशिक महापालिका ही ‘ब’ वर्गात मोडते. त्यामुळे नगरसेवकांना १५ हजार रुपये प्रतिमाह मानधन मिळणार आहे.  यापूर्वी २०१० पासून नगरसेवकांना प्रतिमाह ७,५०० रुपये मानधन अदा करण्यात येत होते. याशिवाय, नगरसेवकांना प्रत्येक महिन्यात होणाऱ्या प्रभाग समिती, स्थायी समिती, महासभा, महिला व बालकल्याण समिती यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास प्रति बैठक १०० रुपये बैठक भत्ताही दिला जातो. नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी यापूर्वीही नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार, नगरसचिव विभागाने दरमहा १० हजार रुपये मानधनाचा प्रस्तावही शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता.  मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. आता शासनाने नगरसेवकांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक महापालिकेला आता १२७ नगरसेवकांच्या मानधनापोटी दरमहा १९ लाख ५ हजार तर वार्षिक २ कोटी २८ लाख लाख रुपये अदा करावे लागणार आहे. मानधनात झालेली वाढकालावधी मानधन१९९२ ते २००१ १,५००२००१ ते २००५ ३,०००२००५ ते २०१० ४,०००२०१० ते २०१७ ७,५००२०१७ पासून १५,०००