CoronaVirus News : मोठा दिलासा! नाशिकमध्ये साहित्य संमेलनासाठी आलेले ते 'बाधित' निघाले 'निगेटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:13 IST2021-12-07T16:07:46+5:302021-12-07T16:13:52+5:30
नाशिक : नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेल्या एकाच बुक स्टॉलवरील प्रकाशकाचे ...

CoronaVirus News : मोठा दिलासा! नाशिकमध्ये साहित्य संमेलनासाठी आलेले ते 'बाधित' निघाले 'निगेटिव्ह'
नाशिक : नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेल्या एकाच बुक स्टॉलवरील प्रकाशकाचे तीन कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे रॅपिड अँटिजन तपासणीत बाधित आढळून आले होते. मात्र, त्यानंतर केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत त्या तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, दोन्हीपैकी कोणत्याही रिपोर्टमध्ये बाधित आढळून आला असल्यास त्यांना ‘पॉझिटिव्ह’ समजूनच उपचार केले जातील, असे मनपाचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.
रविवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्याने आयोजकांसह तपासणी करणाऱ्या आरोग्य यंत्रणेचीही धावपळ उडाली होती. साहित्य संमेलनासाठी शुक्रवारपासून हजारो नागरिक मान्यवर परजिल्ह्यातील साहित्यिक तसेच स्थानिक साहित्य रसिक येऊ लागले होते. त्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकाशकाचे कर्मचारी रविवारीच नाशिकला आले असतानाच गेटवर आलेले असताना तपासणी करण्यात आली असतानाच ते बाधित आढळून आले होते. मात्र, आरटीपीसीआर चाचणीत तिन्ही कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, कोणताही एक अहवाल बाधित असला तरी संबंधितांना बाधित म्हणूनच उपचार केले जातात. ते तिघे पुण्यातून आले असल्याने त्यांच्या अहवालाबाबतची माहिती प्रशासनाच्या वतीने पुण्याच्या जिल्हा आणि मनपा प्रशासनाकडे देण्यात आली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले आहे.