शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

वाया जाणाऱ्या पाण्याची पशु-पक्ष्यांसाठी सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 5:34 PM

माणुसकीचा झरा : औंदाणे ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची धग जाणवू लागली आहे

औंदाणे : दुष्काळी स्थितीमुळे पाण्याच्या एकेक थेंबाचे महत्व वाढू लागले आहे. त्यामुळे एकेका थेंबाची ही लढाई सर्वत्र सुरू असतानाच बागलाण तालुक्यातील यशवंतनगर, औंदाणे येथील ग्रामपंचायत सदस्य शर्मिला गोसावी यांनी पुढाकार घेत नळाद्वारे वाया जाणारे पाणी साठविण्यासाठी हौद तयार करत जनावरांसह पक्ष्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची धग जाणवू लागली आहे. त्याचा फटका पशु-पक्ष्यांनाही बसू लागला आहे. यशवंतनगर औंदाणे येथे ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी भरताना बरेचसे पाणी वायाही जाते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य शर्मिला गोसावी यांनी नळाच्या आजूबाजूला हौद तयार करून वाया जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे परिसरातील शेळ्या-मेंढ्या, जनावरांसह पक्ष्यांचीही पाण्याची सोय होऊ शकली आहे. गोसावी यांना या कामी सरपंच सविता निकम यांचेसह सर्व सदस्य गणेश निकम, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गोसावी यांनी सहकार्य केले. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने वन्य प्राणीही गावाकडे पाण्यासाठी धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.मनाला समाधानगावात नळाद्वारे वाया जाणारे पाणी अडवून हौद बांधण्यात आला. त्यामुळे शेळ्या-मेंढ्या यांच्यासह पक्ष्यांची पाण्याची सोय होऊ शकली आहे. ते पाहून मनाला समाधान वाटते. प्रत्येक नागरिकाने आपल्या गावात घरासमोर, गच्चीवर अथवा शेतात पाण्याची सोय केली तर नक्कीच पशु-पक्ष्यांचेही संरक्षण होईल.- शर्मिला गोसावी, यशवंनगर, ग्रामपंचायत सदस्या

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ