शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू

By admin | Updated: December 2, 2014 01:23 IST

नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू

नाशिक : गोदावरी नदीला आलेल्या महापुरानंतर आखण्यात आलेल्या पूररेषेमुळे शेकडो सामान्य वाडेधारक विस्थापित झाले असताना दुसरीकडे मात्र खास बड्या बांधकाम व्यावसायिकांना खास सवलत दिली की काय अशी शंका निर्माण झाली आहे. गंगापूररोडवर सुयोजित गार्डनजवळ नव्या बांधकामासाठी कामे सुरू झाली आहेच, परंतु त्यासाठी नदीकिनाऱ्याच्या बाजूने भराव टाकण्याचे काम सुरू झाले आहे. या खास बांधकामामुळे परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचविल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांना पालिकेकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत उलट अधिकारी लपाछपीचा खेळ खेळत असल्याने एकूणच बांधकाम आणि परवानगी विषयी संशय निर्माण झाला आहे. नाशिक शहरात २००८ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे हाहाकार उडाला. गंगापूररोडसारख्या नव वसाहतीच्या इमारतींच्या अनेक मजल्यांमध्ये पाणी शिरले होते. मुळातच येथे नदीपात्रालगत झालेले अतिक्रमण हा गंभीर प्रकारही त्यानिमित्ताने उघड झाला. महापालिकेने पाटबंधारे खात्यामार्फत या ठिकाणी गोदावरी नदीला पूररेषा आखण्यात आली. त्यानंतर पालिकेने नदीपात्रालगत सर्व प्रकारच्या बांधकाम परवानग्या स्थगित केल्या आणि नव्याने पूररेषेत बांधकाम परवानगीच न देण्याची भूमिका घेतली. असे असताना आता मात्र सुयोजित गार्डनजवळ नव्याने बांधकामास सुरुवात झाली आहे. पुलाच्या एका बाजूने गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू आहे; परंतु आता रोज सायंकाळनंतर कामाला प्रारंभ होत असतो. पालिकेने एकीकडे पूररेषेत बांधकामांना परवानगी न देण्याची भूमिका घेत गावठाण भागातील पडीक वाड्यात वास्तव्य करणाऱ्यांचे जीव धोक्यात घातले असताना दुसरीकडे मात्र नदीपात्रात पूररेषेतच असे बांधकाम सर्रास सुरू आहे.युवक कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नरेश पाटील यांनी यासंदर्भात नगररचना विभागात बांधकाम परवानग्यांसाठी माहिती घेण्यास सुरुवात केल्यानंतर मोठी चमत्कारिक माहिती देण्यात येत असून, त्यासंदर्भात फाईल ज्या अभियंत्याकडे आहे ते सारेच ‘नॉट रिचेबल’ होत असल्याने त्याविषयी शंका वाढली आहे. एका अभियंत्याने तर सदरच्या बांधकामासाठी पाटबंधारे खात्यातील पूररेषेतील बांधकामांसाठी ना हरकत दाखला दिला असून, संबंधित अभियंताही रजेवर निघून गेल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)