शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावला सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम सुरू

By admin | Updated: June 25, 2014 00:17 IST

मालेगावला सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम सुरू

 

मालेगाव : राज्य शासनाच्या निर्णयानुसार मालेगाव येथील तहसील कार्यालयात सातबारा उतारा संगणकीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ४४ गावांतील सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित काम दि. ३० जूनपर्यंत पूर्णत्वास येणार आहे.सातबारा उतारे आता संगणकाच्या एका क्लिकवर पाहता येणार आहेत. एवढेच नव्हे तर त्याची प्रिन्टही काढता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यांच्या संगणकीकरणाला मालेगाव तहसील कार्यालयात यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. मालेगाव तालुक्यात १५० गावे आहेत तर १० महसूल मंडळे आहेत. दि. १ ते १५ जून या कालावधीत पाच मंडळे, तर दि. १६ ते ३० जून २०१४ या कालावधीत उर्वरित पाच मंडळांतील गावातील सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम होणार आहे. तशी व्यवस्था तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत अशा वेळेत संगणकीकरण करण्यात आली आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत अशा वेळेत संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी १५ संगणक व १५ आॅपरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.सातबारा उतारा संगणकीकरणाच्या कामावर देखरेख व नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संगणकीय कामातील त्रुटी दूर करण्यासाठी ४ नायब तहसीलदारांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. पर्यवेक्षक म्हणून नायब तहसीलदार संजय तराळकर, कूळ वहिवाट शाखेचे अव्वल कारकून व्ही. जी. पाटील काम पाहत आहेत. सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण करताना आतापर्यंत झालेल्या नोंदी, पीक पाहणीच्या नोंदी करण्यात येत आहेत. त्यानंतर प्रिंट काढून त्याची हस्तलिखित सातबारा उताऱ्याच्या प्रतीशी तंतोतंत पडताळणी केली जात आहे. संगणकीकृत केलेले सर्व सातबारा उतारा म्हणजे १०० टक्के उतारे संबंधित तलाठी तपासतील. त्यानंतर मंडळाधिकारी ३० टक्के, नायब तहसीलदार १० टक्के, तहसीलदार पाच टक्के, तर उपविभागीय अधिकारी तीन टक्के उताऱ्याची तपासणी करतील. त्यामुळे काम अचूक होईल, असा विश्वास तहसीलदार पाटील यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत ४४ गावांतील सातबारा उताऱ्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. सातारा संगणकीकरणामुळे कोणत्याही नागरिकाला सातबारा उतारा संगणकावर पाहायला मिळणार आहे. तसेच त्याला आवश्यकता असेल तर त्याची प्रिन्टही काढता येईल.