देशमुख मळा परिसरात दूषित पाणीपुरवठा

By Admin | Updated: August 24, 2016 22:32 IST2016-08-24T22:31:27+5:302016-08-24T22:32:02+5:30

पालिकेचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Contaminated water supply in Deshmukh Mala area | देशमुख मळा परिसरात दूषित पाणीपुरवठा

देशमुख मळा परिसरात दूषित पाणीपुरवठा


सिन्नर : गावाबाहेरील देवीमंदिराजवळ असणाऱ्या देशमुख मळा परिसरातील कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार अ‍ॅड. श्रीराम क्षत्रिय यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
गावाबाहेरील देवीमंदिराजवळ नव्याने वसलेल्या कॉलनीत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. याठिकाणी पालिकेची जलवाहिनी आहे. मात्र सदर जलवाहिनीला कुठेतरी गळती लागली असून, ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत जात असावे असा अंदाज आहे. त्यामुळे नळाद्वारे अतिशय गढूळ आणि दूषित पाणी येत असल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. पाण्याचा वासही सहन न होणारा आहे. सदर पाण्याचे नमुने घेऊन या भागातील नागरिक गेल्या आठवड्यात पालिका कार्यालयात गेले होते. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गळती शोधण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले होते. (वार्ताहर)

Web Title: Contaminated water supply in Deshmukh Mala area