शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

कळवणला ग्राहकांची गर्दी; प्रशासनाकडून बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:15 IST

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्र वार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंतर ठेवल्याचे दिसून न आल्याने पोलीस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाददेखील द्यावा लागला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा सज्जड दम दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मेनरोडसह बसस्थानक, महाराजा चौकात शुकशुकाट झाला.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन : मेनरोडवर शुकशुकाट

कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. शुक्र वार ते रविवार नागरिक व विक्रेत्यांनी मेनरोडवर गर्दी करताना नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंतर ठेवल्याचे दिसून न आल्याने पोलीस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाददेखील द्यावा लागला. यावेळी तहसीलदार बी. ए. कापसे, मुख्याधिकारी सचिन माने, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असा सज्जड दम दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच मेनरोडसह बसस्थानक, महाराजा चौकात शुकशुकाट झाला.सध्या राज्यासह देशात, गावागावांत कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संपूर्ण लॉकडाउन असूनदेखील कळवण नगरपंचायतीने नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून मेनरोड, बसस्थानक परिसर, महाराजा चौकात भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नागरिकांनी भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी शुक्र वार, शनिवार व रविवारी मोठी गर्दी केली होती. २१ दिवसांच्या लॉकडाउन पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांची या तीन दिवसात पायमल्ली झाल्याचे दिसून आले. नागरिकांच्या तसेच भाजीबाजार विक्रेत्यांच्या तोंडावर मास्क दिसून आले नाही. सॅनिटायझरचाही वापर कुठेही दिसून आला नाही. शहरातील बाजार मंडईमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सोशल डिस्टन्स ठेवून भाजी बाजाराचे नियोजन करण्यात आले होते, मात्र कळवणकर जनतेने भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी केल्याने प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील वाढती गर्दी भाजी बाजारात होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्वरित गर्दीला हाकलून लावले तसेच भाजी बाजार बंद केला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणा-या किराणा दुकानदार, भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुळीच जाऊ नका आणि घरच्यांनाही कोणाला जाऊ देऊ नका, भाजीविक्रेता हा आपल्या गल्लीत येईल तेव्हा भाजी घ्यावी, त्याचीही स्वच्छता लक्षात घ्यावी, घरात राहा, नियम पाळा, स्वत:ची काळजी घ्या आणि कोरोना या संसर्गजन्य आजाराला पळवून लावा.- प्रमोद वाघ, पोलीस निरीक्षक कळवण

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार